Sanvad News विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाची छापेमारी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाची छापेमारी

Admin

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाची छापेमारी

 

हेमंत सरकारचे मंत्री मिथिलेश ठाकूर यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. या काळात ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले होते. जलजीवन अभियानाशी संबंधित योजनांमधील अनियमिततेबाबत हा छापा टाकण्यात आला होता.


देशात दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. झारखंडमधील मतदान 13 नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्रातील मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा ज्वर वाढला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झारखंडमधे आयकर विभागाची छापेमारी सुरु झाली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या खासगी साचिवाच्या घरावर छापेमारी सुरु आहे. रांची आणि जमशेदपूरमधे ७ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू असल्यामुळे सोरेन यांच्यासमोर अडचण निर्माण होणार आहे.

कागदपत्रे घेतली ताब्यात

सोरेन यांचे खासगी सचिव सुनील श्रीवास्तव यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. त्यांच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काही केस संदर्भात चौकशी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छापेमारी सुरू असल्याने झारखंडमधीलच नाही तर देशातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

To Top