इंजिनीयर महेशकुमार पाटील यांचा अपक्ष उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांना जाहीर पाठिंबा
आटपाडी kdnews संपादक : आटपाडी तालुक्यातील एकमेव व्यक्तिमत्व काँग्रेस वर एकनिष्ठ प्रेम करणारे इंजिनीयर श्री महेशकुमार दिगंबर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांनी सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष मा.अमरसिंह बापूसाहेब देशमुख प्रमुख उपस्थितीमध्ये आटपाडी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारे व सर्व समाजावर प्रेम करणारे शांत संयमी विचाराचे नेते विधानसभा 2024 चे अपक्ष उमेदवार मा श्री राजेंद्रअण्णा देशमुख यांना आमदार होण्यासाठी व आटपाडी तालुक्याच्या अस्मितेसाठी पाटील परिवारां कडून जाहीर पाठिंबा दिला.
याप्रसंगी इंजिनियर महेशकुमार पाटील म्हणाले की,आटपाडी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आटपाडी शहरांमध्ये होणारी काम चांगली होण्यासाठी आटपाडी शहरांमध्ये नवीन चांगले बदल घडून आणण्यासाठी, आटपाडी शहरातील तालुक्यातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यावरती पहिल्यांदा जे लक्ष घालतील, जे मला साथ देतील मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे. अनेक वेळा फेसबुकच्या माध्यमातून आटपाडीतील सर्व गोष्टी बोलून दाखवल्या आहेत.
निवडणुकीमध्ये उभा असलेल्या सर्व उमेदवारांशी माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत तरी अनेक वर्षानंतर आटपाडी तालुक्याला संधी मिळत आहे आणि तालुक्यातील उमेदवार सर्वांना बरोबर घेऊन काम करूया अशी इच्छा व्यक्त करत आहे. यासाठी मी अपक्ष उमेदवार राजेंद्रअण्णा देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
ही माझी वैयक्तिक भूमिका असून मी मी काँग्रेसच्या विचारानेच काम करेन असे सांगून पाठिंबा दिला आहे.
तसेच याप्रसंगी साई मेडिकल चे मालक निलेश गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा जिल्हा परिषदचे मा.अध्यक्ष श्री अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांनी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शुभेच्छा दिल्या..!!