Sanvad News “तंबाखूमुक्त शिक्षणाची चळवळ उभी करणारे ;“नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिल्पकार प्रशांत चंदनशिवे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

“तंबाखूमुक्त शिक्षणाची चळवळ उभी करणारे ;“नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिल्पकार प्रशांत चंदनशिवे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Admin

 “तंबाखूमुक्त शिक्षणाची चळवळ उभी करणारे ;“नाविन्यपूर्ण उपक्रमांचे शिल्पकार प्रशांत चंदनशिवे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आटपाडीkd24newz:आटपाडी – समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पंचायत समिती, आटपाडी येथे लेखाधिकारी पदावर कार्यरत असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात आटपाडी तालुक्याचा ‘तंबाखूमुक्त शाळा’ म्हणून लौकिक निर्माण करणारे मा. प्रशांत शांतिनाथ चंदनशिवे साहेब यांचा ९ मे रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

       शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे आणि प्रत्येक कामात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सामाजिक जाणिवेची ठसा उमठवणारे चंदनशिवे साहेब हे आटपाडी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

      

तंबाखूमुक्त शाळा उपक्रमात आटपाडी तालुक्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला, याचे प्रमुख श्रेय नोडल अधिकारी म्हणून चंदनशिवे सरांच्या कार्यकुशल नेतृत्वाला जाते. त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि स्थानिक प्रशासन यांना एकत्र आणून एक व्यापक जनजागृती केली. याच बरोबर तंदुरुस्त आटपाडी या उपक्रमास यांचे मोलाचे कार्य आहे, त्यांच्या अथक परिश्रमामुळे शिक्षण क्षेत्रात सामाजिक बदल शक्य आहे हे त्यांनी सिद्ध केले.

     ते नेहमीच ‘माणूसपण जपणं आणि समाजासाठी काहीतरी देणं’ या तत्वावर काम करत आले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीने संवाद साधणारे, मार्गदर्शक वृत्तीचे, आणि प्रत्येकाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणारे प्रशांत सर आज अनेक तरुणांसाठी आदर्श आहेत.

     त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण आटपाडी तालुक्यातून आणि जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकारी सह अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

     “आपल्या नेतृत्वात शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित होतील, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”








To Top