इनर व्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइज् पाचव्या वर्षात पदार्पण ; छाया शेवाळे अध्यक्षपदी,सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर समाजसेवेसाठी नवा संकल्प
आटपाडी kd24newz :मलकापूर, ता. २३ जून २०२५,इनर व्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइज् यावर्षी आपल्या पाचव्या वर्षात पदार्पण करत आहे. कोरोना सारख्या अती गंभीर आणि संवेदनशील काळात चार्टर प्रेसिडेंट छाया शेवाळे यांच्या पुढाकाराने आणि काही मैत्रिणींच्या सहकार्याने क्लबची स्थापना झाली आणि अल्पावधीतच क्लबने समाजसेवेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावर्षी क्लबच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. छाया शेवाळे, सेक्रेटरी पदी चित्रा रामदुर्गकर, पीपी निर्मला वीर, व्हॉइस प्रेसिडेंट वैशाली अशोक पाटील, ट्रेझरर वैशाली लक्ष्मण पाटील, आयएसओ सीमा पाटील, एडिटर रेखा राजगडकर आणि सीपीसी वैदही कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे.
एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये साक्षी पाटील, आशा माने, वैशाली गुरुप्रसाद पाटील, विजया फडतरे यांचा समावेश आहे. डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून पल्लवी पाटील, सुनीता चव्हाण, सुनीता पाटील आणि स्वप्नाली पाटील यांची निवड झाली आहे.
क्लबने मागील चार वर्षांत समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असून यापुढेही निसर्ग संवर्धन, आरोग्य, शैक्षणिक प्रकल्प, महिला सक्षमीकरण, जनजागृती अभियान तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत. समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा क्लबचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे सर्व स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अध्यक्ष छाया शेवाळे यांनी क्लबच्या पुढील वाटचालीबद्दल आशा व्यक्त करत समाजसेवेत नवनवीन उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
संपूर्ण तालुक्यातून क्लबच्या या कार्याचा गौरव होत असून इनर व्हील क्लब ऑफ मलकापूर सनराइज् एक आदर्श सामाजिक संस्थेच्या रूपाने उभा राहत आहे.