म्हसवडमध्ये डॉ. प्रमोद गावडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती
आटपाडी kd24newz :दि. 19 रोजी म्हसवड येथे डॉ. प्रमोद गावडे यांचा वाढदिवस उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे साहेब आणि राज्य समाजकल्याण सभापती मा. ब्रम्हानंद पडळकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मा. अध्यक्ष जयवंत सरगर, डॉ. दोलताडे, युवा नेते उमाजी चव्हाण, महेश विरकर, वैभव हेगडे, तसेच म्हसवड येथील अनेक मान्यवर ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडले. उपस्थित मान्यवरांनी डॉ. गावडे यांना पुष्पगुच्छ देऊन, शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला व त्यांना दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना मंत्री मा. गोरे साहेबांनी डॉ. गावडे यांच्या समाजकार्यातील योगदानाचे विशेष कौतुक केले. समाजकल्याण सभापती पडळकर साहेबांनीही गावडे यांच्या सामाजिक भानाचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपली सामूहिक एकजूट दाखवली आणि डॉ. गावडे यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.