आटपाडीचे नाव राज्यस्तरावर चमकवणारे विलास खरात यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचतर्फे भव्य सत्कार
आटपाडी (kd24newz):आपल्या लेखणीने आणि सामाजिक संघर्षाने आटपाडी तालुक्याचा लौकिक राज्यस्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक व समाजसेवक आयू. विलास खरात यांचा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच, आटपाडी' च्या वतीने फेटा बांधून विशेष गौरव करण्यात आला. कौठुळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या शुभहस्ते विलास खरात यांचा विशेष सन्मान झाला होता, त्याबद्दल प्रबोधन मंचाने त्यांचे जाहीर कौतुक केले.
जिद्दीचा आणि संघर्षाचा सन्मान...
विलास खरात यांना मिळालेला 'आटपाडी भूषण' पुरस्कार आणि बदलापूरच्या 'जनजागृती सेवा संस्थे'चा राज्यस्तरीय पुरस्कार हा त्यांच्या निर्भीड पत्रकारितेचा आणि निःस्पृह सेवेचा विजय आहे.
यावेळी गौरव उद्गार काढताना मंचाचे अध्यक्ष दीपक प्रक्षाळे म्हणाले की, "विलास खरात यांचे कार्य केवळ साहित्यिक नसून ते जमिनीवरच्या संघर्षातून उभे राहिले आहे. 'डबई कुरण' येथील जमिनीसाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून गोरगरिबांना हक्काची जमीन मिळवून देणे हे त्यांच्या अजोड जिद्दीचे प्रतीक आहे. 'आटपाडी मुलुखाचा इतिहास' लिहिण्यासोबतच आंबेडकरी विचार पोहोचवण्याचे महान कार्य ते करत आहेत."
याप्रसंगी सचिव रणजित ऐवळे, हरीभाऊ लांडगे दत्ता कांबळे,व समाज बांधव उपस्थित होते.तसेच आटपाडीत होणाऱ्या ११ जानेवारीला कार्यक्रमाचे निमंत्रण विलास खरात यांना दिले,!
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंचच्या वतीने रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता बाजार पटांगण, आटपाडी येथे एका प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन भव्य सोहळ्याला आटपाडीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दीपक प्रक्षाळे व सचिव रणजित ऐवळे यांनी केले आहे.
या प्रसंगी,दत्ता कांबळे, दिपक प्रेक्षाळे, रणजित ऐवळे, हरीभाऊ लांडगे, उपस्थित होतेविलास खरात यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
