Sanvad News सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचा सांगली जिल्ह्यात भव्य उद्घाटन महा मेळावा;2 मे रोजी तासगांव येथे ऐतिहासिक सोहळा

सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचा सांगली जिल्ह्यात भव्य उद्घाटन महा मेळावा;2 मे रोजी तासगांव येथे ऐतिहासिक सोहळा

Admin

 सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचा सांगली जिल्ह्यात भव्य उद्घाटन महा मेळावा;2 मे रोजी तासगांव येथे ऐतिहासिक सोहळा”


आटपाडी kd24newz : सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने सांगली जिल्ह्यात भव्य उद्घाटन महा मेळावा 2 मे 2026 रोजी तासगांव येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास तब्बल 10,000 पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून, अखंड महाराष्ट्रातून सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे सांगली जिल्हा अध्यक्ष श्री जयंत काका मैदानकर, सौ. मनिषाताई वाघमोडे तसेच सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे सर्व तालुका अध्यक्ष, विभाग प्रमुख व केंद्र प्रमुख यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात येणार असल्याची माहिती मीडिया प्रमुख नारायण वाघमोडे यांनी दिली आहे.

सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचा हा मेळावा विशेषतः सांगली जिल्ह्यातील कोअर कमिटी बळकट करण्यासाठी व नवीन तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.

या भव्य सोहळ्यास सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री मनोजकुमार डांगे साहेब, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री निलेश निकम साहेब, सचिव महाराष्ट्र राज्य श्री संजय सतई सर, आरोग्य महासंचालक श्री चंद्रकांत पाटील सर, ड्रोन सेवा महासंचालक श्री अरविंद पोटे सर, स्वच्छ भारत अभियान महासंचालक श्री दीपक दांदळे पाटील साहेब, सुरक्षा महासंचालक श्री सचिन साबळे सर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री रमेश पाटील सर तसेच पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. स्वाती बोराटे मॅडम यांच्यासह इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरित हा मेळावा सांगली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

To Top