Sanvad News राजमुद्रा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने कवठेमंकाळ येथे दिपावली स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न!

राजमुद्रा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने कवठेमंकाळ येथे दिपावली स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न!

Admin

  राजमुद्रा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या वतीने कवठेमंकाळ येथे दिपावली स्नेहमिलन व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न!



आटपाडी kd24news(प्रतिनिधी): पांडुरंग हातेकर 

सांगली - दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राजमुद्रा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या वतीने कवठेमंकाळ येथे दिपावली निमित्त भव्य स्नेहभोजन व स्नेहमिलन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

कंपनीचे जनरल मॅनेजर (जी.एम.) माननीय श्री. दीपक कुमार सिंह यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. ऐन दिवाळीच्या सणात कंपनीचे ऑपरेशन इन्चार्ज, चालक आणि मेंटेनन्स टीम यांच्या हक्काच्या आनंदासाठी आणि त्यांच्या कामाचा गौरव करण्यासाठी या विशेष स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

🎶 *सांस्कृतिक कार्यक्रम आणि चालकांचे मनोगत:* 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमुद्रा कंपनीच्या चालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी कंपनीकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मनोरंजनात्मक गायनाचा कार्यक्रम देखील रंगला, ज्यामध्ये चालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या गायन कलेचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी रुचकर स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

*प्रमुख उपस्थिती* :

या मंगलप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते, यामध्ये प्रामुख्याने:

• श्री. जे. पी. सिंग सर (ऑपरेशन हेड)

• श्री. गणेश बजबळे सर (ऑपरेशन हेड)

• कंपनीचे सर्व ऑपरेशन इन्चार्ज, चालक आणि मेंटेनन्स कर्मचारी वर्ग.

*आभार प्रदर्शन* :

कार्यक्रमाचा समारोप आटपाडी आगाराचे सहाय्यक आगार व्यवस्थापक श्री. पांडुरंग हातेकर यांनी केला. त्यांनी राजमुद्रा कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत उपस्थित सर्व अधिकारी, चालक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. अत्यंत कौटुंबिक आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला

To Top