Sanvad News भारतीय वायूसेनेला हवीत 114 मल्टी रोल फायटर विमाने, ट्रम्प सरकारचीही नजर

भारतीय वायूसेनेला हवीत 114 मल्टी रोल फायटर विमाने, ट्रम्प सरकारचीही नजर

Admin

 भारतीय वायूसेनेला हवीत 114 मल्टी रोल फायटर विमाने, ट्रम्प सरकारचीही नजर


अमेरिकेत पुन्हा ट्रम्प सरकार येणार असल्याने भारत आणि अमेरिकेतील अनेक डीफेन्स करार मार्गी लागण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेची नजर भारताला हव्या असणार्‍या 114 फायटर जेट करारावर आहे. हा सौदा झाला तर अमेरिकेसोबत भारताही फायदा होणार आहे.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणार असल्याने भारत आणि अमेरिका यांच्या अनेक काळापासून प्रलंबित असलेला वायू सेनेच्या फायटर जेट विमानांचा करार होणार का ? याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या कारकीर्दीत ट्रम्प यांनी भारताशी अनेक करार डिफेन्स करार केले होते. ट्रम्प भारताशी पुन्हा करार करुन शस्रास्रांच्या जागतिक बाजारपेठेत अमेरिकेचे स्थान भक्कम करतील असे म्हटले जात आहे.

भारताच्या वायू सेनेला 114 मल्टीरोल फायटर एअरक्राफ्टची गरज आहे. हा मोठा शस्रास्र करार आहे. अमेरिकेची नजर याकडे आहे. या स्पर्थेत रशिया देखील आहे. रशियाचे Su-35 आणि MiG फायटर जेट, फ्रान्स राफेल, अमेरिकेचे F-21 आणि F/A -18, स्वीडनचे ग्रिपेन आणि युरोफायटर टायफून यांचा यात समावेश आहे. अमेरिकेला भारताने त्यांची फायटर घ्यावे अशी इच्छा अर्थातच असणार आहे.

परंतू या डील संदर्भात अधिकृत घोषणा होणे शिल्लक आहे. परंतू आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व फायटर जेट निर्माता या डीलचे कंत्राट त्यांना मिळावे यासाठी झटत आहेत. अमेरिका संपूर्ण ताकदीने F-21 Fighting Falcon ला प्रमोट करत आहे. हे विमान स्टेट ऑफ द आर्ट F – 16 फायटर जेटची अद्ययावत आवृत्ती आहे. 

ट्रम्प यांचे सरकार आल्याने त्यांच्यासाठी भारताशी हा करार करण्याची मोठी संधी असल्याचे डीफेन्स क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.




To Top