आटपाडी पोलिसांची मोठी कारवाई: अवैद्य दारू वाहतूक करताना दारू साठा जप्त
१,१३६००/- रु अवैद्य दारु साठा व बोलेरो गाडी असा एकुण ८,१३,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त:वाहन चालक ताब्यात
आटपाडी :विधानसभा निवडणुक - २०२४ अनुशंगाने मा.पोलीस अधीक्षक, साो सांगली यांच्या आदेशानुसार अवैद्य दारु वाहतुक,जुगार, गुटखा वाहतुक,गांजा यांचेवर कारवाई करण्याच्या आदेशाने. आटपाडी पोलिसाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती असी की,दि ११ रोजी आटपाडी पोलीस ठाणे हद्दी मध्ये आबानगर चौक,आटपाडी येथे अचानक नाकाबंदी करण्यात आलेली होती. त्यावेळी आटपाडीतील साठेनगर चौक कडुन चारचाकी वाहन आले. त्यां चारचाकी वाहनास पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी थांबणेचा इशारा करुन वाहन थांबवले व गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये वेगवेगळे बॉक्स मिळुन आले. त्यावेळी गाडीचालक यास त्याचे नाव,गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव सलमान एजुल शेख, वय २० वर्षे, सद्या रा. विरंगुळा बार,आटपाडी मुळ रा. फुतकीपुर, ता. जि. साहबगंज, राज्य झारखंड असे सांगितले. त्यावेळी गाडीमधील बॉक्समध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्याने गाडीमध्ये दारु असलेचे सांगितले.त्यास परवाना आहे का याबाबत विचारले असता त्याने कोणताही परवाना नसलेचे सांगितले आहे.त्यावेळी वाहन चालक यास ताब्यात घेण्यात आले व त्यां बॉक्स मधील त्याचे ताब्यात असलेली दारू जप्त करण्यात आली. यामध्ये स्टर्लिंग कंपनीच्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या इंपेरिअल ब्लु कंपनीच्या, हायवर्डस कंपनीच्या असे एकुण १,१३६००/- रु किंमतीचा प्रोव्ही माल व बोलेरो गाडी असा एकुण ८,१३,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ही सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सो सांगली, मा.अपर पोलीस अधीक्षक सांगली, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोो विटा विभाग विटा विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विनय बहिर सो, सपो फौ जगन्नाथ पुकळे, पोह/१८६० दादासाहेब ठोंबरे, पोह/१५६५ विजय कदम, पोह/१६९६ मोहन गवंड, पोकॉ/ २२२४ गजानन देशमुखे, पोकॉ/२४३६ लक्ष्मण मेंडके, पोकॉ/ ६०४ राजीव झाडे, पोकॉ/१६१५ विष्णु भोईनवाड यांनी केली आहे.