Sanvad News निवडणूकीत मी जनतेचा उमेदवार ; सुहास बाबर

निवडणूकीत मी जनतेचा उमेदवार ; सुहास बाबर

Admin

 निवडणूकीत मी जनतेचा उमेदवार ; सुहास बाबर 

विटा येथिल धनगर बांधवांचा शिवसेनेत प्रवेश 


आटपाडी संपादक :स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी पक्ष व गट तटाच्या पुढे जाऊन विटा शहरासह मतदासंघांचा कायपालट करण्याचा प्रयत्न केला. जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी जनतेचा उमेदवार आहे असे प्रकर्षाने जाणवते असे मत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले

    विटा येथील धनगर समाज बांधवांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांना आज जाहीर पाठिंबा दिला. आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते कृष्णात गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ पाटील, सुरेश काका पाटील, शिवाजीराव हारुगडे, माजी नगरसेवक सुमित गायकवाड, संजय लकडे उपस्थित होते. यावेळी योगेश्वर मेटकरी, दत्तात्रय मेटकरी, ऋषिकेश मेटकरी, सतिष मेटकरी, शिवाजी मेटकरी, प्रमोद मेटकरी, जितेंद्र मेटकरी, दत्तात्रय मेटकरी,अनिल मेटकरी, रंजीत मेटकरी, राजेंद्र गारोळे , हर्षवर्धन मेटकरी, राजवर्धन मेटकरी, अशोकनाना मेटकरी, अविनाश मेटकरी, कृष्णात मेटकरी , सुभाष मेटकरी, नितिन मेटकरी, जितेंद्र मंगसुळे, सुशांत मेटकरी, प्रदीप मेटकरी, तुकाराम मेटकरी, आदी मान्यवरांनी सुहासभैया यांना पाठिंबा दिला.

            बाबर पुढे म्हणाले, स्वर्गीय आमदार अनिलभाऊंना दोन निवडणुकीत धनगर समाज बांधवांनी मोलाची साथ दिली.आमचे या बांधवांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत .हे संबंध अतूट ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला स्वर्गीय भाऊंच्या प्रमाणेच आपण सर्वजण मला साथ द्याल याची पूर्ण खात्री व विश्वास आहे. शहराच्या विकासाच्या माझ्या सर्व संकल्पना पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी त्यांच्या राजकीय जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.. येणाऱ्या व्यक्तीचे काम कसे होईल यासाठी भाऊंनी प्रयत्नांची पराकाष्टा केली तीच शिकवण घेऊन त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम मी देखील तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही जे प्रेम मला आज स्वर्गीय भाऊंच्या पश्चात देत आहात त्यामुळे मी अक्षरशः भारावून जात आहे. राजकारणात पावलोपावली ही कृतज्ञता ठेवून मी वाटचाल करीन. असेही बाबर यांनी यावेळी सांगीतल

माताअहिल्यादेवी शिल्प सृष्टी उभारणार:

         माता अहिल्यादेवी होळकर या आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांची शिल्पसृष्टी तरुण पिढीला मार्गदर्शन करावे. अहिल्यादेवींची शिल्पसृष्टी उभारण्याचा माझा प्रयत्न राहील असे बाबर यांनी सांगितले 


 खिलार जनावरांचे संगोपन व संवर्धन केंद्र :

आटपाडीतील खिलार जनावरे आपल्यासाठी ऐश्वर्य मानले जाते. हे ऐश्वर्य जपले जावे यासाठी मतदारसंघांत खिलार जनावरांचे संवर्धन व संगोपन केंद्र उभा करण्याचा माझा प्रयत्न राहिला असेही बाबर यांनी सांगितले. 

 

शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना:

आटपाडी तालुक्यात शेळी मेंढी पालनाचा मोठा व्यवसाय आहे. त्यानिमित्ताने लोकर ,घोंगडी उत्पादन व लघुउद्योग करण्याचा आपल्या मंडळींचा व्यवसाय आहे या व्यवसायाला चालना देणे, तसेच शेळी मेंढी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितले

To Top