Sanvad News अमरसिंह देशमुख यांची दिघंची येथे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी

अमरसिंह देशमुख यांची दिघंची येथे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी

Admin

 अमरसिंह देशमुख यांची दिघंची येथे राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी

मतदार मोठया संख्येने सहभागी,सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

आटपाडी :खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिघंची येथे जि प सांगली चे माजी अध्यक्ष श्री अमरसिंह बापू देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला. याप्रसंगी दिघंची शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर मतदार उपस्थित होते. 

       यावेळी दिघंची मधील सर्व ग्रामस्थांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी तसेच उद्योजक व युवांसाठी मतदार संघात काय करता येईल या योजनांबाबत चर्चा केली. गेल्या २० वर्षात मतदार संघाचे आणि गावाचे झालेले नुकसान व पुढील पाच वर्षात केलेली नियोजित नियोजित विकास कामे यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व गावातील नागरिकांनी तालुक्याच्या अस्मितेसाठी व १९९५ ची पुनरावृत्ती होऊन पुढील विकास कामे करण्यासाठी माननीय राजेंद्रआण्णा देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार केला, आणि सर्वांनी एकमताने राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मागे उभे राहण्याची ग्वाही दिली व राजेंद्र अण्णांची उमेदवारी ही तालुक्याची उमेदवारी असल्याने आता सर्वांनी गट तट विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्यासाठी अमरसिंह देशमुख यांनी राजेंद्रअण्णा यांच्या ऑटोरिक्षा या चिन्हावर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन केले.अमरसिंह देशमुख यांच्या सहभागामुळे कार्यकते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.



दिघंची येथे राजेंद्रआण्णाच्या प्रचारार्थ अमरसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेली प्रचार फेरी.

To Top