Sanvad News "आटपाडीमध्ये 'माणदेश उद्योग समूह' संचलित ड्रायफ्रूट आणि मसाले दालनाचे भव्य उद्घाटन"

"आटपाडीमध्ये 'माणदेश उद्योग समूह' संचलित ड्रायफ्रूट आणि मसाले दालनाचे भव्य उद्घाटन"

Admin

 "आटपाडीमध्ये 'माणदेश उद्योग समूह' संचलित ड्रायफ्रूट आणि मसाले दालनाचे भव्य उद्घाटन"

आटपाडी kd24newz : येथील सांगोला चौकात "माणदेश उद्योग समूह" संचलित ड्रायफ्रूट व मसाल्यांच्या दालनाचा उद्घाटन समारंभ बुधवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी साजरा होणार आहे. श्री गणेशाय नम: म्हणत सर्व देवांच्या साक्षीने नव्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असून, शहरातील नागरिकांसाठी उच्च दर्जाचे ड्रायफ्रूट्स आणि विविध मसाल्यांचे सर्वोत्कृष्ट संकलन येथे उपलब्ध राहणार आहे.

 आपले नम्र श्री. मा. प्रा. बी. ए. पाटील (सर), श्री. गुलाबराव पाटील (Ex C.P.C BAIF UP), श्री. विकास पाटील (माणदेश मेडिकल), डॉ. नितीन पाटील आणि श्री. श्रेयस पाटील (Agri M.B.A.) व प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणारे सर्व मान्यवर व नागरिक यांची उपस्थिती लाभणार आहे.

    या दालनात विविध प्रकारचे दर्जेदार ड्रायफ्रूट्स, वेगवेगळ्या श्रेणीतील मसाले आणि ग्राहकांसाठी आकर्षक सवलतीच्या दरात उपलब्ध असणारी उत्पादने यांचा समावेश करण्यात आला आहे. उद्घाटन समारंभानंतर तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हिडिओ पहा:


      या निमित्ताने आटपाडी शहरातील ग्राहकांना एक दर्जेदार व व्यापक पर्याय उपलब्ध होणार असून, सर्व नागरिकांनी परिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

To Top