Sanvad News संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिनानिमित्त तासगावमध्ये २१७ जणांचे रक्तदान; देशभरात ३०,००० युनिट रक्तसंचय

संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिनानिमित्त तासगावमध्ये २१७ जणांचे रक्तदान; देशभरात ३०,००० युनिट रक्तसंचय

Admin

 संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिनानिमित्त तासगावमध्ये २१७ जणांचे रक्तदान; देशभरात ३०,००० युनिट रक्तसंचय


आटपाडी kd24newz :तासगाव  : संत निरंकारी मिशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे २४ एप्रिल रोजी 'मानव एकता दिवस' श्रद्धा व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ साजऱ्या होणाऱ्या या दिवशी, तासगाव येथील संत निरंकारी सत्संग भवनात आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल २१७ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. देशभरात मिशनच्या ५०० पेक्षा जास्त शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमधून एकूण ३०,००० युनिट रक्तसंचय करण्यात आला.

या शिबिराचे आयोजन सातारा झोनचे झोनल प्रभारी आ. नंदकुमार झांबरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उद्घाटन सेक्टर संयोजक आ. दत्तात्रय जगताप यांच्या हस्ते झाले.

या महाअभियानाच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनने सद्गुरु माता सुदीक्षा महाराज यांचा "करुणा, सेवा आणि एकत्वाचा" संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मानवता हा सर्वोच्च धर्म आहे, याची शिकवण या माध्यमातून मिळाली. मिशन सेवा व समर्पणाच्या मार्गावर चालत मानवतेची मशाल सतत पेटवत आहे.


निरंकारी बाबा हरदेवसिंहजी यांनी दिलेला "रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको" हा संदेश प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या विचारांतून रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचा अविभाज्य भाग मानले जाते.


रक्तदान शिबिराच्या नंतर, मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आ. रुपेश जाधव (सातारा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी बाबा गुरबचनसिंहजी व इतर बलिदानी संतांच्या दिव्य जीवनावर प्रकाश टाकत मानव एकतेच्या मार्गदर्शनाचा संदेश दिला.

या सत्संगास आटपाडी, बिरणवाडी, सावळज, तासगाव व इतर ठिकाणांहून संत महात्मे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी सद्गुरुंचा आशीर्वाद प्राप्त केला.


रक्त संकलनाचे कार्य रेड क्रॉस मान्यता प्राप्त शिरगांवकर रक्तपेढी, सांगली यांच्या सहकार्याने पार पडले. तासगाव शहर व तालुक्यातील युवकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सेवादल युनिट क्र. ११८५ व साधसंगतीने विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्व संत महात्म्यांचे आभार तासगाव चे मुखी आप्पासाहेब कदम यांनी मानले.


To Top