Sanvad News "भारताच्या अखंडतेचा निर्धार; आटपाडी येथे उद्या कॅन्डल मार्चद्वारे पहलगाम हल्ल्याचा निषेध"

"भारताच्या अखंडतेचा निर्धार; आटपाडी येथे उद्या कॅन्डल मार्चद्वारे पहलगाम हल्ल्याचा निषेध"

Admin

 "भारताच्या अखंडतेचा निर्धार; आटपाडी येथे उद्या कॅन्डल मार्चद्वारे पहलगाम हल्ल्याचा निषेध"


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत "मेणबत्त्यांच्या प्रकाशात देशभक्तीचा जाज्वल्य संदेश; भारताची एकता,शांतता आणि सुरक्षिततेचा निर्धार;"शहीदांना श्रद्धांजली,

आटपाडी (kd24newz) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि या भ्याड हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना, निष्पाप नागरिकांना व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्या, सोमवार दि. 28 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत आटपाडी नगरपंचायत परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भव्य कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. 

    या कॅन्डल मार्चमध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, युवक मंडळे तसेच तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत माता की जय! वंदे मातरम! आणि भारतीय सैनिक अमर रहे! अशा राष्ट्रप्रेमाने भारलेल्या घोषणा दिल्या जातील.

       यावेळी प्रत्येक सहभागीने हातात मेणबत्ती घेऊन एकाच वेळी ती प्रज्वलित करणार असून, सुरुवातीला छातीसमोर आणि नंतर डोक्यावर उंच धरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. संपूर्ण कॅन्डल मार्च अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल.

       कार्यक्रम सुरू होण्याआधी दोन मिनिटांचे निषेध भाषण व दोन मिनिटांचे भावपूर्ण श्रद्धांजली भाषण दिले जाईल. या निमित्ताने भारत देशाची अखंडता, एकता व सुरक्षितता यासाठी संकल्पबद्ध होण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.

      जागतिक स्तरावर भारताचा लौकिक व प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी, तसेच मानवतेच्या भावनेतून दहशतवादाचा विरोध करण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहून एकजूटतेचा संदेश द्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.


 "देशहितासाठी, मानवतेसाठी, एकतेसाठी — चला एकत्र येऊया!

"भारताच्या अखंडतेचा निर्धार; आटपाडी येथे उद्या कॅन्डल मार्चद्वारे पहलगाम हल्ल्याचा निषेध"

आपल्या हातात एक ज्योत... आणि हृदयात अमर प्रेम भारतमातेवर!

आटपाडीकरांनी उद्या ठरवले पाहिजे — दहशतवादाचा निषेध आणि भारताच्या एकतेचा विजय!"

To Top