Sanvad News आटपाडीच्या मातीतून उगमलेली प्रेरणादायी वाटचाल

आटपाडीच्या मातीतून उगमलेली प्रेरणादायी वाटचाल

Admin

 चित्रपट महामंडळ, साहित्यिक , पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा प्रभावी आवाज : राहुल खरात यांची बहुआयामी वाटचाल

 
आटपाडीच्या मातीतून उमललेली प्रेरणादायी वाटचाल : सामाजिक कार्यात ही अग्रेसर राहून ठसा मिटवणारे राहुल खरात 

आटपाडी kd24newz :सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावची पावन माती आणि त्यामधून उगमलेला सशक्त आवाज — राहुल खरात हे नाव आज साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात विश्वासार्हतेचा परिचायक ठरले आहे. सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले राहुल खरात हे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित संस्थांमध्ये आपल्या कार्यातून ठसा उमठवत आहेत.

ते सध्या चित्रपट महामंडळ पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत असून, या भूमिकेतून त्यांनी स्थानिक कलाकार, निर्माते व साहित्यिक यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे पुणे जिल्ह्यातील चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्राला नवे वलय लाभले आहे.

राहुल खरात हे 'अखंड मानवता जागतिक पुरस्कार समिती, थायलंड' या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या संस्थेशीही संलग्न असून, जागतिक स्तरावर मानवी मूल्यांचा प्रसार आणि सामाजिक सलोख्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. यासोबतच ते 'जागतिक साहित्य संमेलन' या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील समन्वयक टीमचे सक्रिय सदस्य असून, विविध देशांतील साहित्यिक दुवे जोडण्याचे कार्य ते समर्थपणे पार पाडत आहेत.

त्यांचे घराणेही साहित्य व सामाजिक चळवळीचे स्रोतस्थान आहे. ते श्रेष्ठ व जेष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या घरातील असून, आटपाडीतील प्रखर सामाजिक कार्यकर्ते व संघर्ष योद्धा विलास खरात यांचे बंधू आहेत. या प्रेरणादायी वारशातूनच त्यांनी स्वतःच्या कार्याची स्वतंत्र व ठळक ओळख निर्माण केली आहे.

पुणे येथे चित्रपट सृष्टी बरोबर 'सोर्स साहित्यिक कार्यकारी संघटना'च्या माध्यमातून त्यांनी नवोदित लेखकांना लेखनाच्या नव्या दिशा दाखवल्या. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषमता, आणि सांस्कृतिक बदल यावर आपल्या प्रगल्भ लेखणीतून प्रकाश टाकला आहे.

सामाजिक कार्य, मानवी हक्क, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.

राहुल खरात हे आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या कार्यातून सृजनशीलता, समाजशीलता आणि बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण दिसते. साहित्य, पत्रकारिता आणि समाजकार्य यांचा संगम त्यांच्या कार्यातून साकार होत आहे.

To Top