Sanvad News महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात काव्य संमेलनाचे आयोजन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात काव्य संमेलनाचे आयोजन

Admin

 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात काव्य संमेलनाचे आयोजन


आटपाडी kd24newz(प्रतिनिधी): पाटोदा.. महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळा, पाटोदा येथे सामाजिक समता सप्ताह अंतर्गत भव्य काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांच्या पुढाकाराने कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.


कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निमंत्रित कवींना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आघाव सर यांनी केले.

या काव्य संमेलनात विविध मान्यवर कवींनी आपल्या भावस्पर्शी रचना सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. यामध्ये श्री. किसन हरीभगत (मुख्याध्यापक, भामेश्वर विद्यालय, पाटोदा), माजी मुख्याध्यापक श्री. संजय सावंत (बंकटस्वामी विद्यालय, खडकी घाट), श्री. परशुराम सोंडगे, श्री. अंकुश नागरगोजे, श्री. बाळासाहेब नागरगोजे (‘‘युद्ध पेटले आहे’’ या कवितासंग्रहाचे लेखक), ॲड. विशाल मस्के, श्री. अजय भराटे (‘‘ऊसतोड कामगार’’ कविता फेम), तसेच श्री. सुनील केकान यांनी आपापल्या कविता सादर केल्या.

शाळेतील विद्यार्थिनींनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेत आपल्या कविता सादर करून कौतुकाची थाप मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रागिनी जोगी मॅडम होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सर्व कवींच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत, कविता अत्यंत प्रभावी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. आघाव सर यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. बारगजे सर, सौ. रागिनी जोगी मॅडम, तांबे सर, मुंडे सर, मित्र सर, तांदळे मॅडम, ढोले सर, राऊत सर, डोरले मॅडम, नाईक नवरे मॅडम आदी शिक्षक-शिक्षिकांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.

To Top