कु. याशिका दिक्षित हिचा दहावी परीक्षेत 97.40% गुणांसह घवघविता यश
आटपाडी kd24newz :अमरावती, होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी कु. याशिका राजेंद्र दिक्षित हिने दहावीच्या परीक्षेत 97.40 टक्के गुण मिळवत घवघविता यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे तिच्या शाळेचे, परिवाराचे आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.
कु. याशिका ही महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, मुंबई-32 च्या अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र दिक्षित यांची थोरली कन्या असून, तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिच्या या यशाबद्दल होलीक्रॉस इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर पुष्पा थॉमस, शिक्षकवृंद, आजोबा मनोहर दिक्षित, आई रचना दिक्षित, लहान बहिण कु. हर्षिता दिक्षित, आजी, मामा-मामी व संपूर्ण कुटुंबियांनी तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, राज्य सचिव परमेश्वर बाबर, सातारा जिल्हाध्यक्ष हनुमंत अवघडे, अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी धनंजय वानखडे, जिल्हा सचिव किशोर मालोकार व संपूर्ण जिल्हा व तालुका कार्यकारिणीने देखील कु. याशिका हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.