धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुक्ता संस्थेच्या वतीने अभिवादन
आटपाडी kd24newz :धुळे, दि. १४ मे :धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुक्ता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. “पाहुनी शौर्य तुझं पुढे, मृत्यूही नतमस्तक” या भावपूर्ण शब्दांत संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. (सौ.) मोनिका शिंपी तसेच संस्थेच्या सदस्य निर्मला बाविस्कर, जोशीला सोनवणे, उमा खैरनार, शितल बाविस्कर, हर्षदा बाविस्कर, प्रमिला गुरव, रुचिता चव्हाण, जागृती सोनवणे यांची उपस्थिती लाभली.
डॉ. मोनिका शिंपी या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असून, त्या धुळे जिल्ह्याच्या महिला होमगार्ड अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ बहाल करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्हास्तरीय युवा पुरस्काराचाही त्यांना सन्मान प्राप्त झाला आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या नेतृत्वाचा आणि सामाजिक सहभागाचा उत्तम आदर्श पाहायला मिळाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी शौर्याची आठवण ठेवत, नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे.