डॉ.सौ.राजश्रीताई जाधव यांची सातारा पोलीस मित्र संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
आटपाडी kd24newz संपादक :सातारा : पोलीस व नागरिक यांच्यातील सुसंवाद, सलोखा व सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेल्या पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली – भारत या संस्थेच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. सौ. राजश्रीताई जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
राजश्रीताई जाधव या पशुवैद्यकीय सेवेत डॉक्टर म्हणून कार्यरत असून, त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत, समाजकार्याची बांधिलकी ठेवून पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, आपत्कालीन प्रसंग अशा अनेक वेळा त्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करत सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक श्री. संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार, राष्ट्रीय अध्यक्ष व जनसंपर्क प्रमुख माननीय गजानन भगत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील भाऊ पाटील आणि सांगली जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग हातेकर यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती दिनांक १४ मे २०२६ पर्यंत प्रभावी राहील. त्यांच्या या निवडीमुळे सातारा जिल्ह्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राजश्रीताई यांनी पोलीस मित्र संघटनेच्या कार्याला नवी दिशा दिली असून, इतर जिल्ह्यांतही संघटना विस्तारण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे.
पोलीस आणि नागरिक यांच्यातील पूल मजबूत करून, समाजात शांतता, सहकार्य आणि विश्वास निर्माण करण्यासाठी राजश्रीताई जाधव यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. त्यांच्या पुढील कार्यास पोलीस मित्र संघटना कडून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.