मराठा मंदिर साहित्य पुरस्कार २०२४ : नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी
आटपाडी kd24newz :मुंबई – गेली सात दशके महाराष्ट्रात शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अग्रगण्य ‘मराठा मंदिर’ संस्थेच्या साहित्य शाखेतर्फे नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी “साहित्य पुरस्कार – २०२४” ची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार नवोदित लेखकांच्या प्रथम प्रकाशित पुस्तकांसाठी दिले जाणार असून, यंदाचे हे पुरस्काराचे आठवे वर्ष आहे.
या पुरस्काराच्या वितरणासाठीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल : पात्र ठरण्यासाठी लेखकाचे पहिले पुस्तक दिनांक १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे.
पुस्तकाचे स्वरूप कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, समीक्षणात्मक ग्रंथ, बालवाङ्मय, संशोधनात्मक ग्रंथ, चरित्र (आत्मचरित्र/व्यक्तिचित्रण), प्रवासवर्णन, ललित वाङ्मय किंवा मराठी साहित्यातील इतर कोणताही प्रकार असावे.
हे पुस्तक लेखकाचे स्वतःचे, स्वतंत्र लिखाण असावे. कोणत्याही प्रकारचे अनुवादित किंवा प्रेरित लेखन ग्राह्य धरले जाणार नाही.
लेखकाने प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या २ प्रती व अर्ज ३० जून २०२५ पूर्वी मराठा मंदिरच्या कार्यालयात सादर कराव्यात. अर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे.
पुरस्कारार्थी पुस्तके तज्ज्ञ समितीकडून तपासली जातील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल.
यापूर्वी या पुरस्कारांचे वितरण डॉ. सदानंद मोरे, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. कुमार केतकर, डॉ. नरेंद्र जाधव व डॉ. अनिल काकोडकर या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल व निकाल समारंभादिवशीच जाहीर केला जाणार आहे.
संपर्कासाठी:
डॉ. नितीन श्रीकृष्ण विचारे
अध्यक्ष, साहित्य शाखा, मराठा मंदिर
३रा मजला, मराठा मंदिर इमारत, मराठा मंदिर मार्ग, बाबासाहेब गावडे चौक, मुंबई – ४०० ००८
दूरध्वनी: ०२२-६६०४४१५० / मोबाईल: ९३२४९४२३७७
ई-मेल: marathamandir@hotmail.com
सूचना: पुरस्कारासाठी योग्य संख्येने पुस्तके प्राप्त न झाल्यास संबंधित विभागात पुरस्कार वितरण न करण्याचा अधिकार संस्थेकडे राखीव आहे.
नवोदित लेखकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठा मंदिर साहित्य शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन श्रीकृष्ण विचारे यांनी केले आहे.