तेलगांना चे सत्यशोधक पेटकुले परिवार समताभूमीत सन्मानित !
फुले एज्युकेशन संस्थेचे सत्यशोधक कार्य या आधुनिक काळात तेलगांना राज्यात प्रा.पेटकुले यांचे मुळेच सुरु झाले - सत्यशोधक ढोक
आटपाडी kd24newz :पुणे – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फाऊंडेशन चे बहुउदेषीय सत्यशोधक केंद्रांतर्फे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूमहाराज यांच्या 103 व्या स्मृतिदिनानिमित्त समता भूमीवरील फुले वाड्यात दि.6 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता तेलगांना राज्यातील आदिलाबाद चे प्रा.सुकुमार आणि प्रा.कल्पना पेटकुले यांचा या विज्ञानयुगातील सत्यशोधक कार्य आणि एकपात्री प्रयोगातून फुले दाम्पत्य यांच्या कार्याचा प्रसार व तेलगु भाषेत छापलेले शेतकऱ्याचा आसूड ,सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ आणि स्वतः कृतीशील वारसा चालवीत आपल्या उच्चशिक्षित मुलाचा वं मुलीचा सत्यशोधक विवाह आणि 2019 /2020 मध्ये स्वतःचे भाचे आणि इतरांचा सत्यशोधक विवाह प्रारंभ करण्यास मोलाची मदत केली म्हणून दोघांचे अंगावर एकत्रित फुले उपरण पाघरून थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटोफ्रेम व ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ तसेच महात्मा फुले पगडी घालून येथोचीत सन्मान करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय माळी महासंघ , तेलगांना राज्याचे सचिव प्रा.सबन्ना शेंडे , सावित्री महिला मंडळाचे सौ.गंगुबाई व रोहिता शेंडे आणि विशेष म्हणजे त्यांचे जावई सत्यशोधक ललित कुमार वाढई आणि सत्यशोधिका सुहार्षाराणी वाढई व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी परिचय करून देताना सांगितले की आमच्या संस्थेच्या सत्यशोधक कार्याचा प्रारंभ तेलगांना राज्यात प्रा. पेटकुले यांचे मुळे या विज्ञायुगात सुरु झाला. ते कृतीशील सत्यशोधक कार्यकर्ते असल्याने या पूर्वी अनेक फुले दांपत्या यांचे वरील प्रंथ प्रकाशित केले असून त्यांचे महात्मा फुले समग्र वाड्मय ग्रंथाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. नुकतेच आम्ही त्यांचे माध्यमातून हैद्राबाद येथे उपमुख्यमंत्री ना.रेवंत रेड्डी यांचा आमच्या संस्थेतर्फे 3 जानेवारी 2025 पासून सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस महिला शिक्षक दिन देशात प्रथम सुरु केला म्हणून दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी शानदार सत्कार समारंभ संपन्न केला तसेच त्यांनी मुलांच्या विवाह प्रसंगी सत्यशोधक विवाह माहिती पुस्तिका मी मराठीत आणि त्यांनी तेलगु भाषेत लिहिलेलि हजारांचे संख्येत वाटप केली तसेच आमच्या हस्ते फुले दाम्पत्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन देखील केले म्हणून त्यांचा आम्हास सत्कार केल्याचा सार्थ आनंद होत आहे.
सत्कारास उत्तर देताना प्रा.सुकुमार म्हणाले की या फुले वाड्यात माझा हा दुसरयांदा सत्कार होत असून यावेळी मात्र माझी पत्नी मुलगी आणि माझे जावई हे हजार आहेत. महात्मा फुले यांची पगडी घालून फुले शाहू आंबेडकर संस्थेच्या वतीने सत्यशोधक कार्य पुढे घेऊन जाणारे तसेच जातीभेदाला कृतीने फाटा देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित बहुजनांचे उर्जास्थान व प्रेरणा देणारे या समताभूमीत आज माझा व पत्नीचा जो सन्मान झाला आहे याची उतराई होणे अवघड आहे परंतु आम्हास या सत्काराची पदोपदी जाणीव होऊन आम्ही सत्यशोधक कार्य अखंड चालू ठेऊ असेही ते म्हणाले .
कार्यक्रमाचे सुरुवातीला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास प्रा.सुकुमार व प्रा.कल्पना पेटकुले आणि ललित कुमार वाढई व सुहार्षाराणी वाढई यांचे शुभ हस्ते घालण्यात आला.तर कार्यक्रमाची सांगता सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी सत्याचा अखंड गाऊन उपस्थीत मान्यवरांचे व सत्यशोधक कार्यकर्त्यांचे आभार मानले.