मानवसेवा हीच ईश्वरसेवा – पुणे जिल्हा महिला आघाडी आणि पोलीस मित्र संघटनेचा वारीत अनोखा उपक्रम
आटपाडी kd24newz :पुणे दि 20.पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत आणि पुणे जिल्हा महिला आघाडी तसेच पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी व कमिटी सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी वारीतील पायी चालणाऱ्या हजारो भाविकांसाठी समाजाभिमुख उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी अल्पोपहार, थंड पाण्याची व्यवस्था, औषधी मेडिकल मदत तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
वारी मार्गावर मोठ्या सेवाभावी भावनेने महिला कमिटीने स्वतः पुढाकार घेत थकलेल्या, आजारी भाविकांना औषधोपचार आणि आवश्यक ती मदत केली. अनेक वारकऱ्यांना थकव्यामुळे वैद्यकीय मदतीची गरज होती, त्यांना औषधी मदत देताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. या सेवाकार्यात महिलांनी अतिशय मनोभावे सहभागी होत “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” या ब्रीदवाक्याला न्याय दिला.
वारी मार्गावर सेवेसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर पाण्याची, फळांचा रस, अल्पोपहाराची सोय करून भाविकांच्या सेवा करण्यात आल्या. या उपक्रमामुळे पुणे जिल्ह्यात पोलीस मित्र संघटना आणि महिला आघाडीच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या सेवाकार्यात सहभागी महिलांचे आणि पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक होत असून समाजाप्रती जबाबदारी आणि कर्तव्यभावना जपत पोलीस मित्र संघटना आणि महिला आघाडी यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
संपूर्ण वारी मार्गावर महिलांची सेवा आणि कर्तव्यनिष्ठा हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले असून भाविकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्ञानेश्वर महाराज की जय! संत तुकाराम महाराज की जय! जय हिंद! जय भारत! जय पोलीस मित्र संघटना!
पुणे जिल्हा महिला आघाडी आणि पोलीस मित्र संघटनेचे अभिनंदन!