राजकीय वर्तुळात उत्साहाची लाट : उमाजी चव्हाण यांचा भव्य भाजप पक्ष प्रवेश सोहळा राजेवाडीत संपन्न होणार!
आ.गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थिती.
आटपाडी kd24newz राजेवाडी (ता. आटपाडी) : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याने जनमानसात ठसा उमटविणारे मा. उमाजी चव्हाण हे येत्या रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करणार असून, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक आणि युवा नेतृत्व मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, राजेवाडी येथे सायंकाळी ६:३० वाजता हा सोहळा संपन्न होईल.
या कार्यक्रमात राजकीय वर्तुळात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या उमाजी चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप पक्षाला नवसंजीवनी मिळणार असून राजेवाडी आणि परिसरात पक्ष संघटना अधिक बळकट होणार आहे, असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाला आमदार मा. गोपीचंद पडळकर साहेब, सभापती मा. ब्रम्हानंद पडळकर साहेब, तालुका अध्यक्ष भाजप मा. दादासाहेब हुबाले, युवानेते मा. विनायक काका पाटील (आटपाडी), युवानेते मा. सोमनाथ मोरे आदींची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तसेच या सोहळ्यात पं.स. सभापती मा. जयवंत भाऊ सरगर, ग्रा.पं. सदस्य मा. चंद्रकांत दौंडे, युवानेते मा. विलास काळेबाग, मा. राहूल गुरव, मा. विष्णुपंत अर्जुन (संचालक मार्केट कोमेटी), मा. यु.टी. जाधव (चेअरमन शिक्षक बँक), मा. तानाजी क्षीरसागर, मा. नवनाथ रणदिवे, मा. अक्षयराज माने, मा. अजित जाधव (पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य), मा. प्रणव गुरख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राहूलभैय्या पुजारी, गणेशदादा पुजारी, तानाजी जरग, संजय चागण, शंकर चव्हाण, वैभव हेगडे, तुकाराम हेगडे, जगदीश चव्हाण, काशिनाथ सरतापे, गजेंद्र चांगण, विजय गोरे, बाळासाहेब माने, गणेश पुजारी (सदस्य केशव विद्यागर), गणेश लोखंडे, तानाजी सातपुते, दादासाहेब जरग आणि सहकाऱ्यांनी केले आहे.
उमाजी चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात होईल आणि भाजपची ताकद ग्रामीण भागात अधिक मजबूत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून सर्व कार्यकर्ते, नागरिक, समर्थक व युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.