Sanvad News मा.आमदार सुहास (भैय्या) बाबर यांच्या हस्ते आटपाडी आगारात नव्या एस.टी. बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा!

मा.आमदार सुहास (भैय्या) बाबर यांच्या हस्ते आटपाडी आगारात नव्या एस.टी. बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा!

Admin

 मा. आमदार सुहास (भैय्या)बाबर यांच्या हस्ते आटपाडी आगारात नव्या एस.टी. बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा!

आटपाडी kd24newz: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आटपाडी आगाराच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या एस.टी. बसेसचा भव्य लोकार्पण सोहळा १६ जून २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता आटपाडी एस.टी. आगार प्रांगणात होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मा.आमदार सुहास (भैय्या) बाबर यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.श्री. तानाजीराव पाटील (अध्यक्ष) हे उपस्थित राहणार आहेत.

या नव्या बसेसच्या आगमनामुळे आटपाडी तालुका व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी सेवा मिळणार असून ग्रामीण व शहरी भागांतील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने नवे उपक्रम राबवले असून याचाच एक भाग म्हणून या नव्या बसेस दाखल झाल्या आहेत.

या कार्यक्रमाला विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आटपाडी आगार व एस.टी. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




To Top