Sanvad News "एक नेता... एक भाऊ... एक देवदूत ; सामान्य माणसाच्या मदतीला धावणारे डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेब!"

"एक नेता... एक भाऊ... एक देवदूत ; सामान्य माणसाच्या मदतीला धावणारे डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेब!"

Admin

 "एक नेता... एक भाऊ... एक देवदूत ; सामान्य माणसाच्या मदतीला धावणारे डेडिकेटेड टू कॉमन मॅन एकनाथ शिंदे साहेब!"


    आटपाडी kd24newz :शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब शुक्रवारी मुक्ताईनगर येथे आयोजित संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. कार्यक्रम संपवून मुंबईकडे परतत असताना, विमानतळावर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हा विलंब एका मायभगिनीसाठी जीवनदान ठरला.

     जळगाव जिल्ह्यातील शीतलताई बोरडे, या किडनी विकाराने त्रस्त होत्या आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी पतीसह मुंबईकडे निघाल्या होत्या. दुर्दैवाने त्यांचे निर्धारित विमान चुकले. ही बाब मंत्री मा. गिरीश महाजन यांनी शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली.

    शिंदे साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मान्यता दिली आणि आपल्या चार्टर्ड विमानात या भगिनीस व त्यांच्या पतीसह मुंबईकडे रवाना केले. प्रवासादरम्यान शिंदे साहेबांनी मायेनं चौकशी केली आणि मुंबईत पोहोचल्यानंतर विशेष रुग्णवाहिकेच्या माध्यमातून थेट रुग्णालयात दाखल करून दिले.

     शीतलताईंनी यावेळी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. "शिंदे साहेब नसते मदतीला धावून आले, तर माझी शस्त्रक्रिया वेळेत होऊ शकली नसती," असे त्यांनी भावुक होऊन सांगितले.

    खरं तर, एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेच्या उच्च शिखरावर असले तरी मातीशी नाळ जुळलेली, माणुसकीची जाणीव जपणारी त्यांची ओळख महाराष्ट्राला नवीन नाही. प्रत्येक वेळेस सामान्य जनतेसाठी उभे राहणं, हा त्यांचा स्वभावधर्म आहे.

    "एक भाऊ आपल्या बहिणीच्या मदतीला जसा धावतो, तसंच शिंदे साहेबांनी दिलेल्या या मदतीमुळे ते शीतलताईंसाठी खऱ्या अर्थाने देवदूतच ठरले."

     संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिलं की "डेडिकेटेड टू कॉमन मॅन" ही केवळ शब्दांची माळ नसून एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यशैलीची जिवंत साक्ष आहे.

To Top