Sanvad News प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या जयंतीनिमित्त गौरव ग्रंथ व दोन पुस्तकांचे भव्य प्रकाशन सोहळा

प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या जयंतीनिमित्त गौरव ग्रंथ व दोन पुस्तकांचे भव्य प्रकाशन सोहळा

Admin

 प्रा.विश्वनाथ जाधव यांच्या जयंतीनिमित्त गौरव ग्रंथ व दोन पुस्तकांचे भव्य प्रकाशन सोहळा 


आटपाडी kd24newz दि. २:प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक आणि प्रेरणादायी प्राध्यापक प्रा. विश्वनाथ जाधव यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य साहित्यिक सोहळ्यात त्यांच्या कार्यावर आधारित "विश्वम" या गौरव ग्रंथासह "मुलुख माणदेश" व "झपाटलेली माणसे" या दोन पुस्तकांचे प्रकाशन मंगळवार, दि. ३ जून रोजी सायं. ५ वाजता आटपाडीत संपन्न होणार आहे.


हा प्रकाशन सोहळा एस. टी. स्टॅन्डजवळील मुख्य रस्त्यालगत असलेल्या कल्लेश्वर मंदिर सभागृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माणदेशातील बहुआयामी नेतृत्व अमरसिंहबापू देशमुख असतील.


कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, माजी प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी, निसर्ग व बालकवी सुभाष कवडे, पुरोगामी विचारवंत भाई संपतराव पवार, समीक्षक प्रा. अरुण शिंदे आणि प्रकाशक इंद्रजित घुले यांची उपस्थिती लाभणार आहे.


याशिवाय या साहित्य समारंभात जे. आर. चव्हाण, डॉ. एम. वाय. पाटील, दिनेेश देशमुख, मेघा पाटील, पुष्पा मिसाळ, सुधीर इनामदार, डॉ. विनय पत्की, निर्मलकुमार जुगदर, अरुणा चव्हाण, साहेबराव चवरे, प्रदीप पाटील सर, जयसिंह देशमुख सर, शिवाजीराव बंडगर, संभाजीराव गायकवाड, प्रा. विजय शिंदे, प्रा. श्रीकृष्ण पडळकर या मान्यवरांचा देखील विशेष सहभाग राहणार आहे.


या सोहळ्यास प्रा. विश्वनाथ जाधव प्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी आणि माणदेशातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. चंद्रसेन जाधव, ॲड. चेतन जाधव, डॉ. सुप्रिया जाधव आणि प्रा. अनुराधा जाधव यांनी केले आहे.



To Top