Sanvad News स्मृती जपण्याचा अनोखा उपक्रम : कै. अरविंद कोडग यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वड, चिंच, जांभळ, रामफळ यांची वृक्षरोपण मोहीम

स्मृती जपण्याचा अनोखा उपक्रम : कै. अरविंद कोडग यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वड, चिंच, जांभळ, रामफळ यांची वृक्षरोपण मोहीम

Admin

स्मृती जपण्याचा अनोखा उपक्रम : कै. अरविंद कोडग यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वड, चिंच, जांभळ, रामफळ यांची वृक्षरोपण मोहीम





आटपाडी kd24newz :आवंढी :कै. अरविंद संभाजी कोडग यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मूळ गावी आवंढी येथे त्यांच्या सहकारी व नातेवाईकांच्या उपस्थितीत एक सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या निमित्ताने वड, चिंच, जांभळ, रामफळ अशा विविध प्रकारच्या स्फुट वृक्षांच्या झाडांचे वाटप करण्यात आले.


    विशेष म्हणजे जीवन मोरे (जावई - दिघची, ता. आटपाडी) यांनी सर्व झाडे या उपक्रमासाठी भेट स्वरूपात दिली. त्यांच्या पुढाकारातून व त्यांच्या कडून मिळालेल्या झाडांच्या सहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच श्रीनाथ नर्सरी (देवापूर) यांनीही कार्यक्रमास प्रोत्साहन देत ११ झाडे अतिरिक्त स्वरूपात दिली.


   या वेळी उपस्थितांनी आपल्या कार्यक्रमांमध्येही अशाप्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. "वाढत्या प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी हिरवे वैभव जपणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अशाप्रकारचे वृक्षरोपण व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम अधिकाधिक राबवावेत," असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.














To Top