Sanvad News खानापूर-विटा शहरात भाजपला जोरदार हादरा

खानापूर-विटा शहरात भाजपला जोरदार हादरा

Admin

 खानापूर-विटा शहरात भाजपला जोरदार हादरा : पंकज (भैया) दबडे, संदीप (तात्या) ठोंबरे यांचा अजित पवार गटात प्रवेश; पडळकर गटाला मोठे भगदाड, राजकीय समीकरणे पालटली


आटपाडी kd24newz /विटा,मुंबई दि. 24 जून : सांगली जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ऐतिहासिक घडामोडी आज मुंबई येथे घडल्या. भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत जिल्हा सचिव पंकज भैया दबडे आणि फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निशिकांत (दादा) भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

    या ऐतिहासिक पक्षप्रवेशामुळे खानापूर मतदारसंघ आणि विटा शहरातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून भाजपचा गट अक्षरशः ढासळला आहे. या भव्य सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. आटपाडी तालुक्याचे युवा नेतृत्व अनिल शेठ पाटील यांची उपस्थिती देखील या सोहळ्याला विशेष महत्त्व देणारी ठरली.

    पंकज भैया दबडे आणि संदीप तात्या ठोंबरे यांनी अनेक वर्षे भाजपच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून कार्य केले. त्यांनी उभे केलेले युवकांचे संघटन आता राष्ट्रवादीच्या बळकटीत जमा झाल्याने खानापूर आणि विटा परिसरातील राजकीय चित्रच बदलून गेले आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. विशेषतः आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गटाला मोठे भगदाड पडले असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या घडामोडीचा मोठा परिणाम दिसून येईल, असे स्पष्ट दिसत आहे.

  यावेळी पंकज भैया दबडे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, “तोच उत्साह, तीच दृष्टी… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यासाठी मी रात्रंदिवस झटणार आहे. पक्षात प्रवेश दिल्याबद्दल मा. अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार.”वेक्त केले.

तर संदीप तात्या ठोंबरे म्हणाले की,“आत्तापर्यंत आम्ही सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वासाठी कार्य केले. आता या लढ्याला राजकीय बळ देण्यासाठी आणि विटा शहर व खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली नवा अध्याय सुरू करत आहोत. आम्ही यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर लढा देत राहू.”

   अजित पवार यांनी या प्रवेशाचा स्वागत करताना म्हटले की,“हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.”

    या पक्षप्रवेशामुळे जिल्यासह विटा शहरात खळबळ उडाली असून, अनेक ठिकाणी चर्चा रंगली आहे की हा प्रवेश म्हणजे खानापूर मतदारसंघातील राजकीय सत्तासमीकरणांचे नवे चित्र तयार करणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यातच हे मोठे भगदाड पडल्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळेल.

       या पक्षप्रवेशामध्ये राष्ट्रवादी सांगली जिल्हा अध्यक्ष मा. श्री निशिकांत (दादा) पाटील यांचे नेतृत्व विशेष ठळक राहिले. त्यांच्या पुढाकारामुळे पंकज दबडे, संदीप ठोंबरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास अजित पवार गटावर बसला आणि हा पक्षप्रवेश साध्य झाला.

    या पक्षप्रवेशाने भाजपचा गट ढासळला असून, युवक संघटना राष्ट्रवादीच्या गोटात आली असून विटा व खानापूरात राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटली आहेत.यामुळे पडळकर गटावर दबाव वाढला असून,राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.आगामी निवडणुकांत याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे.

To Top