मा. अमोल दादा बाबर यांच्या प्रयत्नाने मयत कर्जदाराच्या कुटुंबास ११ लाख रुपयांचा धनादेश प्रदान
आटपाडी kd24newz ;सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विटा शाखेच्या माध्यमातून, तसेच बँकेचे संचालक मा. अमोल दादा बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून विटा नगरपरिषदेच्या कर्मचारी स्व. अनिता विजय सकट यांचे कर्ज इन्शुरन्स पॉलिसीद्वारे पूर्णपणे निल करण्यात आले.
या माध्यमातून स्व. सकट यांच्या कुटुंबाला ₹११ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला. बँकेच्या कर्ज विमा योजनेमुळे मयत कर्जदाराच्या कुटुंबावर येणारा आर्थिक भार कमी झाला असून, ही योजना समाजहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे.
या प्रसंगी बोलताना मा. अमोल दादा बाबर यांनी सांगितले की, “सहकारी बँकिंग ही फक्त कर्ज देण्यासाठी नसून, संकटाच्या काळात सदस्यांच्या कुटुंबाला आधार देणे हेही आमचे कर्तव्य आहे. अशा योजनांमुळे सदस्यांना व त्यांच्या कुटुंबियांना खरी आर्थिक सुरक्षा मिळते.”
या प्रसंगी स्व. अनिता सकट यांच्या कुटुंबीयांनी भावनिक शब्दांत मा. अमोल दादा बाबर यांचे मनापासून आभार मानले. त्यांनी म्हटले, “अमोलदादांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्या कुटुंबावरचे ओझे हलके झाले, त्यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला. संकटाच्या काळात दिलेला हा हातभार आम्ही कधीच विसरणार नाही, असे कुटुंबीयांनी सांगितले.
सदर कर्ज निल दाखला प्रदान कार्यक्रमास तालुका विभागीय अधिकारी श्री. ए. ए. मुल्ला , एसआरओ श्री. एस. व्ही. शिंदे, शाखाधिकारी श्री. वाय. जी. शिकलगार, तसेच पप्पू दाजी कदम उपस्थित होते.
