Sanvad News प्रभाग ७ मध्ये शहाजीबापू जाधव यांचे नाव सर्वत्र घुमतंय!

प्रभाग ७ मध्ये शहाजीबापू जाधव यांचे नाव सर्वत्र घुमतंय!

Admin

 प्रभाग ७ मध्ये शहाजीबापू जाधव यांचे नाव सर्वत्र घुमतंय!


“मी कुणाच्याही विरोधात नाही; केलेल्या कामांच्या जोरावरच बोलतो :-तानाजीराव पाटील”


आटपाडी kd24newz :प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू जाधव यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळत असून संपूर्ण प्रभागात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. घराघरातून, शेतशिवारातून, शहराच्या गल्लीबोळातून शहाजीबापू जाधव यांच्याच समर्थनाचा सूर कानावर येत आहे. “ही उमेदवारीशीट चांगल्या मतांनी निवडून येणार” असा ठाम विश्वास जनतेत दिसत आहे.

     प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन व आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांनी शहाजीबापू जाधव यांचे काम, प्रामाणिक भूमिका आणि जनसंपर्काची ताकद याचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले,

“प्रभाग ७ चा विकास हा शहाजीबापू जाधव यांच्याशिवाय शक्य नाही. मी कोणत्याही विरोधाची भाषा करत नाही; मी केलेल्या कामांच्या जोरावरच बोलतो आणि त्या कामावरच मत मागतो. आणि शहाजीबापू जाधव हे जनतेसाठी खंबीर, विकासाभिमुख आणि विश्वासू नेतृत्व आहे.”

     तानाजीराव पाटील यांच्या शब्दांनी प्रचारात नवे ऊर्जाभरित वातावरण निर्माण झाले असून जनतेचा उत्साह अधिक दुणावला आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा मोठा प्रतिसाद पाहून प्रभाग ७ चा कल शहाजीबापू जाधव यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.तानाजीराव पाटील यांच्या समर्थनाने प्रचाराला नवं बळ मिळाले असून,स्थानिकांमध्ये एकच चर्चा होत आहे की,“शहाजीबापू जाधव ठाम! जनता त्यांच्या पाठीशी भक्कम उभी!”

To Top