Sanvad News प्रभाग ८ मध्ये तुफानी उत्साह; निशिगंधा शरद पाटील यांच्या प्रचारसभेला जनसागर!

प्रभाग ८ मध्ये तुफानी उत्साह; निशिगंधा शरद पाटील यांच्या प्रचारसभेला जनसागर!

Admin

 प्रभाग ८ मध्ये तुफानी उत्साह; निशिगंधा शरद पाटील यांच्या प्रचारसभेला जनसागर!

“काम केले म्हणून विश्वास, आणि त्या विश्वासामुळेच निशिगंधाताई विजयी!-तानाजीराव पाटील 


 आटपाडी kd24newz :प्रभाग क्रमांक ८ मधील शिवसेनेच्या उमेदवार निशिगंधा शरद पाटील यांच्या प्रचारार्थ पांढरेवाडी येथे झालेल्या सभेत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी जोरदार भाषण करत प्रभागातील जनतेचा वाढता उत्साह, निशिगंधाताईंची विकासनिष्ठ कामपद्धती आणि शिवसेनेच्या नेतृत्वातील पारदर्शक धोरण यांचा ठाम उल्लेख केला. पांढरेवाडी, पाटील मळा, काळा मळा येथील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने संपूर्ण परिसरात निवडणूक उत्साहाचे वातावरण अधिक रंगतदार बनले.



तानाजीराव पाटील म्हणाले, “आम्ही आटपाडीकरांसाठी केलेल्या प्रत्येक कामाचा ठोस पुरावा तुमच्यासमोर आहे. प्रभाग ८ मधील रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता आणि नागरिकांसाठीच्या सोयी—हे सगळे विकासकाम स्वतः बोलत आहेत. शिवसेना कामावर विश्वास ठेवते, आणि काम करणाऱ्यांना जनता कधीच नाकारत नाही.” त्यांनी पुढे भर घालत सांगितले की, “निशिगंधाताईंच्या नेतृत्वात प्रभाग ८ चा विकास अधिक वेगाने होणार आहे. महिलांसाठी, वृद्धांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी त्या जे काम करतात, त्याची जाण तुम्हा प्रत्येकाला आहे. म्हणूनच या प्रभागात विजयी होणारी उमेदवार एकच—निशिगंधा शरद पाटील.”

पांढरेवाडीतील सभेत उपस्थित शेकडो नागरिकांच्या टाळ्यांच्या गजरात तानाजीराव पाटील यांनी विरोधकांवरही सडकून टीका करत म्हटले की,“निवडणुकीपुरता जागा होणाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता कंटाळली आहे. दिशाभूल, अफवा आणि फसव्या गाजावाजावर मत मागणाऱ्यांना प्रभाग ८ मध्ये जागा नाही. लोकांना विकास हवा आहे, आणि विकासाचा चेहरा म्हणजे निशिगंधाताई!”

    सभेत उपस्थित महिलांनी निशिगंधाताईंच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. पाटील मळा, काळा मळा आणि पांढरेवाडी येथील युवकांनीही “प्रभाग ८ मध्ये विजय निश्चित” असा नारा दिला.

सभा एकसंध, उत्साहपूर्ण आणि दमदार वातावरणात पार पडली. उपस्थितांच्या प्रतिक्रिया पाहता प्रभाग ८ मध्ये निशिगंधा शरद पाटील यांना मिळत असलेला जनसमर्थनाचा प्रवाह दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे.“प्रभाग ८ मध्ये निशिगंधाताईंचा विजय ठरलेलाच”असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

To Top