आटपाडीत उद्या भाजपची महातोफ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील मंचावरून करणार प्रचंड जोरदार हल्ला!
आटपाडी kd24newz – आटपाडीच्या पहिल्या ऐतिहासिक नगराध्यक्षपदाच्या लढाईत भाजपने उद्यापासून रणशिंग फुंकले आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सभेने संपूर्ण तालुका हादरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.“
जिंकायचंच!” असा निश्चय करून भाजप आता प्रचंड आक्रमक व्यूहरचना राबवत असून, आटपाडीकरांचे लक्ष उद्याच्या सभेकडे खिळले आहे.
नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने सत्तेचा मानाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर येणार यासाठी भाजप–शिवसेना–संयुक्त विकास आघाडीमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे.
भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन यु. टी. जाधव यांना अखाड्यात उतरवून मोठा राजकीय दांव खेळला आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि जि. प. चे माजी अध्यक्ष अमरसिंग देशमुख एकाच व्यासपीठावर आल्याने भाजपाचा आत्मविश्वास आणखी फुगला आहे. दोन्ही नेत्यांची जुगलबंदी हीच भाजपाची ‘धडाडीची ताकद’ म्हणून चर्चेत आहे.
निवडणुकीच्या रणांगणात आरोप–प्रत्यारोपांचे फटाके उडू लागले असून, प्रभागनिहाय समीकरणे तापू लागली आहेत.
या सर्व गदारोळात भाजपाच्या ‘दुसऱ्या नंबरच्या फळी’लाही मैदानात उतरवले जात असल्याने विरोधकांची गडबड उडाल्याचे दृश्य दिसत आहे.उद्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आटपाडीत गर्जना करणार असून
शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सभेने भाजप आटपाडीत सलग दोन दिवस ‘दिग्गज तोफांची फायरिंग’ करणार आहे.दरम्यान, हे दोन्ही मंत्री आटपाडीत कोणत्या मुद्द्यावर कोणता दारूगोळा उडवणार?
पक्ष संघटनांची उणीव भेदणार की विरोधकांवर थेट प्रहार करणार?आटपाडीकरांमध्ये याची प्रचंड उत्सुकता आहे.
उद्या आटपाडीत भाजपची तोफ धडाडणार आणि नगराध्यक्षपदाच्या लढतीत मोठी राजकीय वळण घेणार… अशीच चर्चा सर्वत्र!
