नेलकरंजी येथे संविधान दिन साजरा ; संविधाना मुळेच भारतात लोकशाही बळकट ; नंदकुमार झंजे
आटपाडी kd24newz ;संविधान नागरिकांना आपल्या अधिकारांबरोबरच आपल्या कर्तव्याचे पालन कसे करायचे याची जाणीव करून देते.संविधाना मुळेच देशातील लोकशाही अधिक बळकट झाली आहे.त्यामुळे संविधान समजून घेणे फार महत्वाचे आहे असे मत अखिल भरतीय मराठा व्यापारी असोसिएशन चे राष्ट्रीय संचालक नंदकुमार झंजे यांनी व्यक्त केले.नेलकरंजी येथे संविधान दिनानिमित्त ते बोलत होते.यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.
नंदकुमार झंजे यांनी सांगितले की भारतात विविधतेत एकता आहे.आणि डॉ.आबाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेल्या संविधानामुळे सर्वजण गुण्या गोविंदाने राहतात.संविधाना मुळे सर्वांना समान हक्क मिळाला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वोच्च संविधानाची भेट दिली.आपल्याला संविधान समजून घेणे गरजेचे आहे.नागरिकामध्ये जागरूकता आणण्याचे काम संविधानामुळेच शक्य झाल्याचे मत नंदकुमार झंजे यांनी व्यक्त केले.
यावेळी नंदकुमार झंजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी नेलकरंजी चे सरपंच नवनाथ मेटकरी,उपसरपंच सुशांत भोसले,गोरख घाडगे,ग्रामसेवक अण्णासाहेब माने, निवृत्ती मेटकरी,रोहित घाडगे,मोहन माळी,किशोर भोसले,अण्णासाहेब जाहीर ,शरद झंजे गणेश झंजे, शिवाजी येळे, अशोक कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
