Sanvad News “समाजकारण हीच साधना असलेले नेतृत्व ; सहा नंबर वार्डात जीवन शिवाजीराव पोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा”

“समाजकारण हीच साधना असलेले नेतृत्व ; सहा नंबर वार्डात जीवन शिवाजीराव पोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा”

Admin

 “समाजकारण हीच साधना असलेले नेतृत्व ; सहा नंबर वार्डात जीवन शिवाजीराव पोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा”


आटपाडी (kd24newz)आटपाडी ;सहा नंबर प्रभागात आगामी निवडणूक समीप येत असताना जुन्या भाजप कार्यकर्त्यांमधून तयार झालेले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह आणि ६९ वेळा रक्तदान करणारे ज्येष्ठ समाजसेवक श्री. जीवन शिवाजीराव पोळ हे जनतेच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. राजकारणापेक्षा समाजकारण प्रथम या विचारावर ठाम असलेल्या पोळ यांच्या नेतृत्वाकडे मतदार आशेने पाहत आहेत. एसीसी सिमेंट डीलर या व्यवसायातून त्यांनी शहरातील सामान्य नागरिकांशी सखोल संबंध दृढ केले असून समाजिक संकटाच्या काळात तत्पर धावून जाणारा चेहरा म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित आहे.

   श्री. जीवन पोळ यांची समाजसेवा ही त्यांच्याकडे ‘परंपरा’ म्हणून घरातूनच आलेली. त्यांचे वडील श्री. शिवाजीराव पोळ सर यांनी शिक्षक म्हणून आयुष्यभर विद्यार्थ्यांचे जीवन घडवले, तर एसीसी वितरणाच्या माध्यमातून शहरातील अनेक कुटुंबांना आधाराचा हात दिला. त्यांच्या घरातील सौ. अर्चना पोळ मॅडम या अंगणवाडी सेविकेच्या भूमिकेतून मातांचे, बालकांचे, कुटुंबांचे प्रश्न समजून घेऊन मदत करणाऱ्या म्हणून संपूर्ण प्रभागात ‘मदतगार ताई’ म्हणून परिचित आहेत. तसेच दीपक पोळ, किरण पोळ आणि डॉ. रविराज पोळ यांच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रक्तपेढी व सामाजिक समन्वयाची सेवा अखंड सुरू आहे.

    श्री. जीवन पोळ यांची नेतृत्वघडण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सहकार भारती, संस्कार भारती, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या संघटनात्मक वातावरणात झाली. शिस्त, कार्यपद्धती, लोकसंपर्क आणि सामाजिक समंजसपणा, या सर्वांची सांगड घालून घडलेले हे नेतृत्व चंद्रकांत दादा पाटील आणि पालकमंत्री दादांच्या मार्गदर्शनात कार्यरत राहिले आहे. त्यामुळे प्रभागातील अनेकांना “नेतृत्व हवं तर असं” हे सांगावसं वाटत आहे.

  आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आवाहन, “एक लाख नवयुग तरुणांनी समाजकारणात प्रवेश करावा”, हाच संदेश सहा नंबर वार्डात श्री. पोळ यांच्या माध्यमातून जिवंत होताना दिसतो. संघाची शिस्त, भाजपाचा अनुभव,

समाजकारणाचा वारसा आणि जनतेशी नैसर्गिक नाळ, या चार पायावर उभा असलेला हा उमेदवार म्हणून नागरिकांच्यात त्यांच्याविषयी स्पष्ट विश्वास आणि आशा निर्माण झाली आहे.

    प्रभागातील वयोवृद्ध, महिला, व्यावसायिक, तरुण वर्ग अशा सर्व घटकांमध्ये एकच अभिप्राय ठळक झाला आहे.“एकदा संधी द्या,काम आपोआप बोलेल.”

काम करणारा चेहरा, समाजासाठी झटणारा स्वभाव, संघाच्या संस्कारातून घडणारा स्वभाव आणि जनतेचा विश्वास, या चार आधारांवर श्री. जीवन शिवाजीराव पोळ हे सहा नंबर प्रभागातील प्रभावी, सक्षम आणि जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून प्रबळ दावेदार ठरत आहेत.

To Top