इस्लामपूरमध्ये यशस्वी टोटल हिप रिप्लेसमेंट; २ वर्षे जुन्या हिप-इजेला नवी चालना!
डॉ. जयदीप पाटील यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेमुळे रुग्ण पुन्हा सक्षम!
व्हिडिओ पहा. 👇
आटपाडी kd24newz ;इस्लामपूर, दोन वर्षांपूर्वी झालेल्या दुर्लक्षित हिप फ्रॅक्चर-डिस्लोकेशनमुळे गंभीर वेदना, चालण्यात अडचण आणि तब्बल पाच सेंटीमीटर पायाची उंची कमी झालेल्यासह जगत असलेल्या ३५ वर्षीय तरुणाचे आयुष्य अंधारमय झाले होते. मात्र, इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटलमध्ये नामांकित अस्थिरोग तज्ञ डॉ. जयदीप पाटील यांच्या कौशल्यपूर्ण हस्तक्षेपामुळे या रुग्णाला नवजीवन लाभले आहे.
डॉ. पाटील यांनी या रुग्णावर अत्यंत क्लिष्ट टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडत पायातील ५ सें.मी. shortening पूर्णपणे सुधारले. विस्कटलेले हिप-सांध पुनर्स्थापित करत रुग्णाची चालण्याची क्षमता पुन्हा सामान्य करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका महिन्यातच हा रुग्ण कोणत्याही आधाराविना सामान्यपणे चालू लागला आहे. दोन वर्षे भोगलेल्या तीव्र वेदना, असह्य त्रास आणि हालचालींवरील बंधने आज पूर्णपणे मागे पडली आहेत.
“अशा जुन्या व क्लिष्ट केस मध्ये पायातील उंची पुन्हा योग्य करणे आणि सांध्याची संपूर्ण कार्यक्षमता पूर्ववत करणे ही मोठी शास्त्रकौशल्याची परीक्षा असते. मात्र, रुग्ण आज वेदनाशिवाय चालताना दिसतो आहे, हीच आमच्या कार्याची सर्वात मोठी समाधानाची भावना,” असे डॉ. जयदीप पाटील यांनी सांगितले.
इस्लामपूर परिसरात प्रगत अस्थिरोग उपचारामध्ये डॉ. पाटील यांच्या तज्ज्ञ सेवेमुळे गंभीर रुग्णांना नवी आशा मिळत आहे.
