Sanvad News खानापूरमध्ये मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय व डॉ. के. आर. पवार ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

खानापूरमध्ये मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय व डॉ. के. आर. पवार ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Admin

 खानापूरमध्ये मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय व डॉ. के. आर. पवार ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद; चार तास रंगला नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम

 


आटपाडी संपादक kd24newz खानापूर,कै. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ, खानापूर संचलित मातोश्री वेणूताई चव्हाण विद्यालय व डॉ. के. आर. पवार ज्युनिअर कॉलेज, खानापूर या प्रशालेचा शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. खंडोजी आकाराम पाटील, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती शोभादेवी पवार (माई) यांनी भूषविले.


कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. आनंदराव शेडगे (कनिष्ठ लेखापाल, मुंबई), खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक व वीरशैव लिंगायत समाज तालुका अध्यक्ष मा. श्री. जगदीश (काका) टिंगरे, संस्था अध्यक्ष मा. श्री. धैर्यशील (राजन) पवार, संस्था सचिव सौ. अंजली पवार (मॅडम), सौ. शोभादेवी पवार इंग्लिश मीडियम स्कूल, खानापूर येथील प्राचार्य श्री. अविनाश गायकवाड (सर), सोनाई गुरुकुल खानापूरचे अधीक्षक श्री. ज्ञानदेव राऊत (सर), क्रीडा प्रशिक्षक श्री. गोपाल राऊत (सर), भूड येथील सिद्धनाथ विद्यालयाचे लेखनिक श्री. सूर्यकांत पवार (सर) यांच्यासह परिसरातील पालक, विशेषतः महिला पालक, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संस्थापक स्व. डॉ. के. आर. पवार (दादा) व संस्थेचे दैवत कै. वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व मनोगत प्राचार्य श्री. शिवाजी पवार यांनी मांडले. यावेळी संस्था अध्यक्ष श्री. धैर्यशील (राजन) पवार यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

प्रमुख पाहुणे डॉ. खंडोजी पाटील यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी व आत्मविश्वास आवश्यक असल्याचा मौलिक सल्ला दिला.

या स्नेहसंमेलनात विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मराठी व हिंदी गाण्यांवर आधारित विविध नृत्यप्रकार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सुमारे चार तास चाललेल्या या नेत्रदीपक कार्यक्रमाने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला.

अतिशय नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुलाब काटकर (सर) व कु. प्रतिभा धेंडे (मॅडम) यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. श्री. प्रशांत चव्हाण यांनी मानले.

To Top