सावित्रीच्या लेकी स्वसंरक्षणात सक्षम; आटपाडीत मुलींसाठी सुरू असलेल्या कराटे प्रशिक्षण उपक्रमाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हाधिकारी अशोकजी काकडे व शिक्षणाधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपक्रमास गटशिक्षणाधिकारी मयूर लाडे यांची भेट
आटपाडी संपादक kd24newz :दिघंची, मुलींच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत त्यांना स्वसंरक्षणाचे सक्षम प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कराटे प्रशिक्षण उपक्रमाची पाहणी आटपाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. मयूरजी लाडे साहेब यांनी केली.
मा. श्री. अशोकजी काकडे साहेब, जिल्हाधिकारी सांगली व मा. शिक्षणाधिकारी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, दिघंची येथे गटशिक्षणाधिकारी लाडे साहेबांनी प्रत्यक्ष भेट देत कराटे प्रशिक्षणाची सखोल पाहणी केली.
यावेळी विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या कराटे प्रशिक्षणाची गुणवत्ता, शिस्त, प्रशिक्षण पद्धती तसेच विद्यार्थिनींचा सहभाग याचा आढावा घेत लाडे साहेबांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी प्रशिक्षण अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण राबविण्याबाबत मार्गदर्शन करत अशा उपक्रमांमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, धैर्य व सुरक्षिततेची जाणीव निर्माण होते, असे मत व्यक्त केले.
या पाहणीप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साळुंखे मॅडम, कराटे प्रशिक्षक श्री. पोपटजी वाघमारे,श्री. प्रशांत शिंदे -भाळवणकर माजी विद्यार्थिनी कुमारी मधुरा शिंदे, तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वसंरक्षणाचे धडे घेणाऱ्या सावित्रीच्या लेकी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उत्साहाचे कौतुक करत, मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे नमूद केले.

