Sanvad News बाळेवाडीतील नागरिकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; निंबवडे गटात शिवसेनेची ताकद वाढली

बाळेवाडीतील नागरिकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; निंबवडे गटात शिवसेनेची ताकद वाढली

Admin

 बाळेवाडीतील नागरिकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश; निंबवडे गटात शिवसेनेची ताकद वाढली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ येथे जनसंवाद मेळावा; महिला, युवा व ज्येष्ठ नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 आटपाडी kd24newz ; बाळेवाडी येथे शिवसेना पक्षाला मोठे बळ मिळाले असून बाळेवाडी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. निंबवडे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना जनसंवाद मेळाव्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

    यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण समाजकल्याण सभापती सौ. संगिता गणपतराव खरात, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. बायनाबाई श्रीमंत खताळ, सौ. कासाबाई भिमराव भुते, माजी चेअरमन रामचंद्र कारंडे, गजानन कोळेकर, कोळेकरवाडीचे ज्येष्ठ नेते व माजी उपसरपंच बापू गणपती कोळेकर (मास्तर), लक्ष्मण कोळेकर (देवरसवस्ती पंच), काका कोळेकर, माजी उपसरपंच संतोष कोळेकर, लक्ष्मण कोळेकर (बुवा), माजी उपसरपंच शंकर कोळेकर, दादा भगवान खताळ, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पुकळे, युवा नेते दत्तात्रय पुकळे, सुभाष पुकळे, आप्पासाहेब खताळ, नामदेव ढेरे, राहुल खरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश केला.

    या मेळाव्यात निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्याताई सचिनजी मोटे व निंबवडे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार मा. सचिन (दादा) मोटे उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे तालुका व जिल्हास्तरीय नेते मा. तानाजीराव पाटील (अध्यक्ष), मा. सरपंच जगन्नाथ कोळेकर, मा. सरपंच आबासाहेब भुते, मा. सरपंच गणपतराव खरात, मा. सरपंच व पोलीस पाटील श्रीमंत खताळ, युवा उद्योजक मा. आशिष (दादाशेठ) कचरे, मा. उपसरपंच तानाजी कोळेकर, मा. मधुकर खरात, मा. आप्पा (शेठ) कोळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य मा. शिवाजी कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

    निंबवडे व बनपुरी परिसरातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच बाळेवाडीतील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, महिला माता-भगिनी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी चेअरमन यांनी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पक्षप्रवेशामुळे निंबवडे गटात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला निश्चितच लाभ होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

To Top