सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात नवे पर्व; विनायक शेठ मासाळ यांची दमदार एन्ट्री
समाजकारणातील उगवता सूर्य… निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा!
आटपाडी kd24newz :सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची ठाम पावले उमटू लागली असून, समाजकारणातून राजकारणात आलेले, कार्यकर्त्यांच्या विश्वासाचे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी कायम बांधील असलेले मा. श्री. विनायक शेठ मासाळ हे नाव सध्या जिल्हाभरात केंद्रस्थानी आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून करगणी जिल्हा परिषद गटातून मैदानात उतरलेल्या विनायक शेठ मासाळ यांनी राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक लढत अधिक रंगतदार झाली आहे.
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महाराष्ट्र राज्य) मध्ये जबाबदारी सांभाळत असताना संघटन बांधणी, कार्यकर्त्यांना न्याय, तसेच गावागावातील विकास प्रश्नांना प्राधान्य देणारी त्यांची भूमिका नेहमीच ठळक राहिली आहे. “राजकारण ही सत्ता नव्हे, सेवा आहे” या भूमिकेवर ठाम असलेले विनायक शेठ मासाळ हे नाव आज तरुण, शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या आशेचे प्रतीक बनले आहे.
विकासाचा स्पष्ट रोडमॅप, नेतृत्वाचा आत्मविश्वास...!
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता याबाबत त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि ठोस विकास आराखडा मतदारांमध्ये विश्वास निर्माण करत आहे. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, अडचणींवर तत्काळ तोडगा आणि सातत्यपूर्ण उपस्थिती हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
राजकीय वातावरणात वाढती ताकद...!
करगणी गटासह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नावाची चर्चा असून, विविध राजकीय घटक, सामाजिक संघटना आणि युवक वर्गातून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. अनुभवी नेतृत्व आणि नव्या पिढीचा आत्मविश्वास यांचा समतोल साधणारे नेतृत्व म्हणून विनायक शेठ मासाळ यांच्याकडे पाहिले जात आहे.
विजयाच्या दिशेने भक्कम पावले....!
आगामी जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ एक निवडणूक न राहता, विकास, विश्वास आणि नेतृत्वाच्या कसोटीची लढत ठरणार असून, त्या लढतीत विनायक शेठ मासाळ यांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.समाजकारणातील उगवता सूर्य आता जिल्हा परिषदेच्या राजकारणात तेजाने झळकू लागला आहे…निर्धार विकासाचा आहे आणि संकल्प विजयाचा!
