Sanvad News “बनपुरीत विद्याताई घरोघरी, सर्वांचे डोळे पानावले; विद्याताईच्या नेतृत्वाने गाव भारावले!”

“बनपुरीत विद्याताई घरोघरी, सर्वांचे डोळे पानावले; विद्याताईच्या नेतृत्वाने गाव भारावले!”

Admin

 “बनपुरीत विद्याताई घरोघरी, सर्वांचे डोळे पानावले; विद्याताईच्या नेतृत्वाने गाव भारावले!”

शहिदांच्या भूमीतून परिवर्तनाचा शंखनाद; विद्याताई मोटेंच्या थेट जनसंवादाने विरोधकही अचंबित

आटपाडी प्रतिनिधी :देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहिद जवान विष्णू पुकळे यांच्या पवित्र भूमीत असलेल्या बनपुरी गावात निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ॲड. विद्याताई सचिन मोटे यांनी घरोघरी जाऊन थेट जनसंवादाचा ऐतिहासिक प्रचार दौरा केला. प्रचार म्हणजे केवळ भाषण नव्हे, तर लोकांच्या जीवनाशी थेट नातं जोडण्याची प्रक्रिया असते, हे विद्याताईंनी या दौऱ्यातून अधोरेखित केले.

प्रत्येक घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवत त्यांनी नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली. महिलांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तर ज्येष्ठ नागरिकांच्या पाया पडून त्यांनी आशीर्वाद घेतले. “उमेदवार स्वतः घरी येऊन प्रश्न विचारतो, ऐकतो आणि उत्तर देतो,” या अनुभवाने बनपुरीतील मतदार भारावून गेले.याच दरम्यान संपूर्ण गावात “गाव बनपुरी… विद्याताई घरोघरी!” असा उत्स्फूर्त नारा घुमू लागला. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक सर्वजण एकत्र येत परिवर्तनाच्या या प्रवासात सहभागी झाले. या भेटींमुळे गावात उत्साह, विश्वास आणि सकारात्मक ऊर्जा संचारली.

ऊर्जा, अभ्यास आणि सातत्याचा झंझावात.....

तरुण, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ॲड. विद्याताई सचिन मोटे बनपुरी गावात पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे अविरत फिरताना दिसल्या. त्यांच्या कार्यपद्धतीतील शिस्त, सातत्य आणि प्रचंड ऊर्जेने कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले.यावेळी एका महिला कार्यकर्तीने भावना व्यक्त करताना सांगितले,“विद्याताई यांची ऊर्जा हीच आमची प्रेरणा आहे. एवढा सक्षम, अभ्यासू आणि लोकांशी थेट जोडलेला उमेदवार आम्हाला मिळाला आहे. हीच परिवर्तनाची खरी सुरुवात आहे. आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू.”

‘एक संधी… आणि आयुष्यभराची जबाबदारी’......

प्रचारादरम्यान बोलताना ॲड. विद्याताई मोटे म्हणाल्या,“मी केवळ मत मागण्यासाठी नाही, तर परिवर्तन आणि विकासाचा नवा विचार घेऊन तुमच्याकडे आले आहे. तुम्ही दिलेली एक संधी हीच तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची माझी जबाबदारी ठरेल. तुमचे प्रश्न, तुमचा विश्वास आणि तुमची स्वप्ने — मी कधीही विसरणार नाही.”त्यांच्या या स्पष्ट, ठाम आणि विश्वासार्ह भूमिकेने नागरिकांमध्ये विशेष सकारात्मक प्रतिसाद उमटला.

व्यावसायिक, उद्योजक आणि युवतींचा ठाम पाठिंबा....

बनपुरी गावातील व्यावसायिक, उद्योजक वर्गाने विद्याताईंना जाहीर पाठिंबा दर्शवला. गावातील युवतींनी रोजगार, शिक्षण, सुरक्षितता आणि विकासाशी संबंधित मांडलेले विषय त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकून घेतले. थेट संवाद, आपुलकी आणि स्पष्ट दृष्टिकोन यामुळे विद्याताईंविषयी नागरिकांमध्ये दृढ विश्वास निर्माण झाला आहे.

विरोधकांसाठी धोक्याची घंटा.....

बनपुरीत झालेला हा जनसंपर्क दौरा केवळ प्रचार न राहता निंबवडे गटातील राजकीय समीकरणे बदलणारा टर्निंग पॉईंट ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. जनतेचा वाढता उत्साह, महिलांचा ठाम पाठिंबा आणि तरुणांचा विश्वास पाहता विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, विद्याताई मोटेंची वाटचाल विजयाच्या दिशेने वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

To Top