Sanvad News नेलकरंजी येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

नेलकरंजी येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

Admin

 नेलकरंजी येथे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन


आटपाडी kd24newz :नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या विकासकामांमुळे येत्या काळात गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडून येणार आहे.

     या उद्घाटन कार्यक्रमात ग्रामपंचायत परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, कुरण रस्त्याचे मुरमीकरण, खंदारे घरापासून रस्त्याचे काँक्रिटीकरण, बँक ऑफ महाराष्ट्रपासून बंदिस्त नाली बांधकाम, मायाका मंदिराजवळ रस्ता बांधकाम, सतीश नागरे यांच्या घराजवळ रस्ता काँक्रिटीकरण, माळी वस्ती व ज्योतिबा मंदिराजवळ सभामंडप बांधकाम, पवार वस्ती खडीकरण प्रस्ताव, मासाळ वस्ती डांबरीकरण तसेच खंदारे मंदिर ते मरी आई मंदिर दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण आदी विकासकामांचा समावेश आहे.

      या सर्व कामांमुळे गावातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होणार असून नागरिकांना शासकीय, सामाजिक व धार्मिक सुविधांचा लाभ मिळणार आहे. तसेच सुरक्षितता, निवास सुविधा व प्रशासकीय सोयींना बळकटी मिळणार आहे.

    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार सुहास बाबर म्हणाले की, “गावाचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो. आज ज्या कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे, ती सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावाला आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावरच पुढे चालत असून सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवूनच आमचे विकास धोरण आखले आहे.”

     या उद्घाटन कार्यक्रमास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री. तानाजी पाटील, नेलकरंजी गावचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत भाऊ पाटील, सरपंच सौ. पूजा मेटकरी, सुशांत भोसले, धोंडीराम (चेअरमन) भोसले, आप्पासाहेब भोसले, विलास भोसले, जितेंद्र पाटील, किशोर पाटील, जगन्नाथ भोसले, शशिकांत भोसले, सतीश भोसले, मोहन माळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top