Sanvad News आवटेवाडी–धावडवाडी मध्ये भाजपाला स्फोटक कौल : ‘कमळ’च ठरलं!

आवटेवाडी–धावडवाडी मध्ये भाजपाला स्फोटक कौल : ‘कमळ’च ठरलं!

Admin

 आवटेवाडी–धावडवाडी मध्ये भाजपाला स्फोटक कौल : ‘कमळ’च ठरलं! 


सर्व महिलांनी हातात घेतली प्रचाराची सत्ता; भाजपच्या झंझावाताने विरोधक पुरते हादरले


चंद्रकांत भोसले–लता पुजारी यांच्या प्रचारात जनसागर; विकासाच्या नावावर एकमुखी निर्णय


आटपाडी प्रतिनिधी :आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खरसुंडी तालुक्यातील आवटेवाडी व धावडवाडी गावांनी राजकीय चित्र स्पष्ट करत ‘कमळ’लाच मत देण्याचा ठाम आणि अंतिम निर्णय जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने या गावांमध्ये अक्षरशः राजकीय वादळ निर्माण केले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार श्री. चंद्रकांतभाऊ श्रीरंग भोसले आणि खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ. लता अर्जुन पुजारी यांच्या प्रचारासाठी आवटेवाडी–धावडवाडीमध्ये महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांचा लोंढा उसळला. विशेष म्हणजे, यावेळी प्रचाराची सूत्रे महिलांनीच हाती घेतली असून, महिलांचा अभूतपूर्व सहभाग हा या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरत आहे.

प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी थेट शब्दांत सांगितले की, रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व बाबींमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. फक्त भाषणे देणाऱ्यांना नाकारून, प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वालाच मत देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे यावेळी कोणतीही तडजोड न करता ‘कमळ’ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार जाहीरपणे व्यक्त करण्यात आला.

 संपूर्ण गटात महिलांचा उठाव – घराघरांतून ‘कमळ’चा नारा....!

या प्रचारामध्ये महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, पाणी प्रश्न, शिक्षण आणि कुटुंबाच्या मूलभूत गरजा या मुद्द्यांवर महिलांनी स्पष्ट भूमिका घेतली. “घर चालवताना अडचणी काय असतात, हे आम्हाला माहीत आहे; आणि त्या सोडवण्याची ताकद भाजपकडेच आहे,” असे ठाम मत महिलांनी व्यक्त केले. परिणामी, या निवडणुकीत महिलांचे मतदान भाजपसाठी निर्णायक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

यूवक वर्गानेही प्रचारात आघाडी घेतली. “आता फसव्या आश्वासनांचा काळ संपला आहे; विकास करणारे नेतृत्वच हवे,” असा सूर युवकांमध्ये दिसून आला. यामुळे विरोधकांची झोप उडाली असून, भाजपच्या वाढत्या जनसमर्थनामुळे त्यांची गणिते कोलमडताना दिसत आहेत.

 भाजपचा झंझावात – विरोधकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात...!

प्रचार सभेत “कमळ निवडूया, भविष्य घडवूया” हा नारा घुमत असताना, संपूर्ण आवटेवाडी–धावडवाडी परिसरात भाजपच्या विजयाची खात्री निर्माण झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, खरसुंडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात भाजपचा विजय आता केवळ औपचारिकता उरली असून, विरोधकांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

या प्रचारात खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले–पाटील,खरसुंडी पंचायत समिती गणातील उमेदवार लता अर्जुन पुजारी,माजी सभापती अलकाताई भोसले, माजी सरपंच अंजली गुरव,सीमा चंद्रकांत भोसले–पाटील, माजी उपसरपंच अर्जुन पुजारी सावकार,माजी सरपंच धोंडीराम इंगवले, राहुल गुरव, शशिकांत भोसले,ग्रामपंचायत सदस्य किरण पुजारी,धावडवाडीचे माजी डेप्युटी सरपंच अलीभाई शेख, दिलावरभाई शेख, युसुफभाई शेख,महेश गुरव, ओंकार गुरव, वैभव पुजारी, एकनाथ भोसले,अमोल पुजारी, विवेक गुरव, किरण पुजारी, तानाजी शिरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने आवटेवाडी -धावडवाडीतील महिला कार्यकर्त्या, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

To Top