आटपाडीचे ज्येष्ठ लेखक व इतिहास संशोधक विलास* *खरात यांचा पंढरपूरमध्ये गौरव
श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 'अखंड मानवतावादी संस्था' तर्फे सन्मान
आटपाडी ; पंढरपूर - येथील 'अखंड मानवतावादी संस्था' यांच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात आटपाडीचे सुपुत्र, ज्येष्ठ लेखक आणि इतिहास संशोधक विलास खरात यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मा. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.
विलास खरात यांनी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले असून, त्यांच्या अनेक साहित्यकृतींना राज्य व जिल्हा स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंढरपूरमधील अखंड मानवतावादी संस्थेने त्यांना सन्मानित केले.
यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी खरात यांच्या संशोधक वृत्तीचे आणि लेखणीचे कौतुक केले. "इतिहासातील सत्य पैलू समाजासमोर आणण्याचे महत्त्वाचे काम खरात सर करत आहेत," असे गौरवद्गार त्यांनी काढले.
या सन्मानाबद्दल आटपाडीसह संपूर्ण जिल्ह्यातून विलास खरात यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आटपाडीच्या साहित्य विश्वातील एक मानाचा तुरा म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.
विलास खरात सरांच्या या यशाबद्दल पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन! आपल्या आटपाडीच्या मातीतील माणसे जेव्हा अशी मोठी कामगिरी करतात, तेव्हा खूप अभिमान वाटतो.
