Sanvad News करगणीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप!विजय (महाराज) सरगर यांची भाजपमधून शिवसेनेत घरवापसी, महायुतीच्या उमेदवारांना ताकदवान पाठिंबा

करगणीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप!विजय (महाराज) सरगर यांची भाजपमधून शिवसेनेत घरवापसी, महायुतीच्या उमेदवारांना ताकदवान पाठिंबा

Admin

 करगणीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप!विजय (महाराज) सरगर यांची भाजपमधून शिवसेनेत घरवापसी, महायुतीच्या उमेदवारांना ताकदवान पाठिंबा

आटपाडी kd24newz :करगणी परिसरात पुन्हा एकदा मोठा राजकीय धमाका झाला असून भाजपमध्ये असलेले विजय (महाराज) सरगर यांनी शिवसेनेत जाहीर घरवापसी करत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महायुतीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना–राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मा. विनायकराव मासाळ (साहेब) व करगणी पंचायत समिती गणाचे उमेदवार मा. दत्तात्रय पाटील यांच्या उमेदवारीला विजय (महाराज) सरगर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याच वेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. सागर (भाऊ) लांडगे यांनीही महायुतीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. सुहास (भैय्या) बाबर यांच्या हस्ते हा जाहीर शिवसेना प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार बाबर यांनी, “महायुती ही विकास, विश्वास आणि जनहिताची आघाडी असून करगणी गटात परिवर्तन निश्चित आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.

विजय (महाराज) सरगर यांनी प्रवेशावेळी बोलताना सांगितले की, “शिवसेना ही सामान्य जनतेची, कष्टकऱ्यांची आणि पुरोगामी विचारांची चळवळ आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या माध्यमातून करगणी परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आम्ही केला आहे.”

या प्रवेशामुळे करगणी गटात महायुतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकास्तरीय पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

एकूणच करगणी गटात सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे निवडणूक रंगत चढत असून, महायुतीकडे वाढणारा ओढा हा विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

To Top