करगणीत परिवर्तनाचा एल्गार! संवाद दौर्यातून विनायकराव मासाळ– रामदास सूर्यवंशींच्या विजयाची नांदी!
आटपाडी तालुक्यात तडवळे, लेंगरेवाडी,मासाळवाडी, माडगूळे,य.पा.वाडी येथे राष्ट्रवादी–शिवसेना युतीचा झंझावाती प्रचार; मान्यवरांच्या आक्रमक मनोगतांनी विरोधकांवर घणाघात!
आटपाडी (kd24newz)करगणी जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार मा. विनायकराव मासाळ साहेब व माडगुळे पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मा. रामदास सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आटपाडी तालुक्यातील तडवळे, लेंगरेवाडी,मासाळवाडी, माडगूळे व य.पा.वाडी येथे सलग संवाद दौर्यातील कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात व जनसमर्थनाच्या गजरात पार पडल्या. या सभांनी करगणी गटातील राजकीय वातावरण तापवले असून परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून आली.
या संवाद दौर्यात माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, आमदार सुहासभैय्या बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व अध्यक्ष तानाजीराव पाटील, भारतदादा पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिलशेठ पाटील, सभापती संतोष पुजारी यांच्यासह अनेक ज्येष्ठ मान्यवर, पदाधिकारी, युवक-युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा जनतेचा स्पष्ट कौल दर्शवणारा ठरला.
माजी आमदारराजेंद्र आण्णा देशमुख यांनी आपल्या ठसठशीत भाषणात सांगितले की, “करगणी गटाला विकासाची दिशा देणारे नेतृत्व हवे असेल तर मासाळ–सूर्यवंशी हीच जोडी आहे. कामावर विश्वास ठेवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी आहे.”
आमदार सुहासभैय्या बाबर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवताना म्हटले, “फक्त घोषणांची राजकारणे आता चालणार नाहीत. जनतेला काम करणारे, गावागावातील प्रश्न सोडवणारे प्रतिनिधी हवेत. ही निवडणूक विकास विरुद्ध दिखावा अशी आहे.”
अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था, सहकार, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत, “युतीचे उमेदवार निवडून दिल्यास निधी, योजना व विकास कामांना गती मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.
उमेदवार मा. विनायकराव मासाळ यांनी जनतेशी थेट संवाद साधत, “करगणी गटाचा सर्वांगीण विकास, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ही आमची प्राथमिकता आहे. जनतेचा विश्वास हीच आमची ताकद,” असे ठामपणे सांगितले.
मा. रामदास सूर्यवंशी यांनी पंचायत पातळीवरील प्रश्नांवर भर देत, “गावागावातील समस्या थेट सोडवण्यासाठी आम्ही सतत उपलब्ध राहू. पंचायत समितीत जनतेचा आवाज बुलंद करू,” असा निर्धार व्यक्त केला.
या संवाद दौर्यातून युतीने करगणी गटात आक्रमक प्रचार करत विकास, विश्वास आणि परिवर्तन हा स्पष्ट संदेश दिला आहे. युवक व महिलांचा वाढता सहभाग, नागरिकांची गर्दी आणि घोषणांचा उत्साह पाहता, करगणी जिल्हा परिषद गटात मासाळ–सूर्यवंशी यांची जोडी निर्णायक आघाडीवर असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे.
एकूणच, आटपाडी तालुक्यातील या झंझावाती संवाद दौर्याने निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, करगणीत युतीचा विजय अटळ असल्याचा ठाम विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत.


