करगणी गटात चालणार स्व. अजितदादा पवार यांचं घड्याळ
विनायक मासाळ – दत्तात्रय पाटील यांच्या प्रचार शुभारंभाला शेटफळेत जनसागर; राष्ट्रवादी–शिवसेना युतीचा आक्रमक निर्धार
आटपाडी प्रतिनिधी : करगणी जिल्हा परिषद गटात यावेळी स्व. अजितदादा पवार यांचं घड्याळ चालणारच, असा ठाम व आक्रमक संदेश देणारा प्रचार शुभारंभ आज शेटफळे येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस + शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार मा. विनायक मासाळ साहेब तसेच पंचायत समितीचे उमेदवार मा. दत्तात्रय पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ उत्स्फूर्त वातावरणात करण्यात आला.
प्रचार पदयात्रा, जाहीर सभा आणि जनतेशी थेट संवाद यामुळे संपूर्ण शेटफळे गावासह पंचक्रोशीत युतीच्या विजयाचा सूर उमटताना दिसून आला. गावागावात घड्याळाच्या चिन्हाला मिळणारा प्रतिसाद पाहता करगणी गटात राष्ट्रवादी–शिवसेना युतीचा कौल स्पष्ट होत असल्याचे चित्र दिसून आले.
या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र (अण्णा) देशमुख यांनी उपस्थित राहून आक्रमक शब्दांत मार्गदर्शन केले. ते म्हणाले,“स्व. अजितदादा पवार यांचे विचार, त्यांचे नेतृत्व आणि ग्रामीण विकासासाठीची बांधिलकी आजही जनतेच्या मनात जिवंत आहे. करगणी गटात यावेळी घड्याळ हेच विश्वासाचं, विकासाचं आणि जनतेच्या न्यायाचं प्रतीक ठरणार आहे. विनायक मासाळ आणि दत्तात्रय पाटील हे उमेदवार म्हणजे कामाचा अनुभव, स्वच्छ प्रतिमा आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व अध्यक्ष मा. तानाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवक अध्यक्ष मा. अनिलशेठ पाटील, डॉ. उन्मेश देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करत युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी “घड्याळ चालणारच” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
गेल्या काही वर्षांत या भागात रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ग्रामविकास, सामाजिक सुविधा यांसारख्या अनेक विकासकामांना गती मिळाली असून, उर्वरित प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी–शिवसेना युती कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीत सक्षम प्रतिनिधी निवडून दिल्यास विकासाचा वेग दुप्पट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात युवकांसह मोठ्या संख्येने महिलाभगिनींची उपस्थिती ही विशेष लक्षवेधी ठरली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत युतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. महिलांचा हा वाढता विश्वास म्हणजे युतीच्या विजयाची नांदी असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
एकूणच, शेटफळे येथील हा प्रचार शुभारंभ म्हणजे केवळ कार्यक्रम न राहता करगणी गटात राष्ट्रवादी–शिवसेना युतीच्या विजयाचा रणशिंग ठरला आहे. जनतेचा विश्वास, कार्याचा अनुभव आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळे यावेळी घड्याळाचं खणखणीत नाणं करगणी गटात वाजणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

