Sanvad News खरसुंडी गटात भाजपची उसळली लाट ; जाहीर सभेला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद! आ. गोपीचंद पडळकर व बापूसाहेब देशमुखांचा विरोधकांवर दुहेरी घणाघात; चंद्रकांत भोसले– लताताई पुजारी यांचा विजय अटळ!

खरसुंडी गटात भाजपची उसळली लाट ; जाहीर सभेला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद! आ. गोपीचंद पडळकर व बापूसाहेब देशमुखांचा विरोधकांवर दुहेरी घणाघात; चंद्रकांत भोसले– लताताई पुजारी यांचा विजय अटळ!

Admin

 खरसुंडी गटात भाजपची उसळली लाट ; जाहीर सभेला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद 

आ. गोपीचंद पडळकर व बापूसाहेब देशमुखांचा विरोधकांवर दुहेरी घणाघात; चंद्रकांत भोसले– लताताई पुजारी यांचा विजय अटळ

 आटपाडी प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी गटात भारतीय जनता पार्टीने प्रचारात निर्णायक मुसंडी मारली असून, खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. चंद्रकांतभाऊ भोसले व खरसुंडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. लताताई अर्जुन पुजारी यांच्या प्रचारार्थ आयोजित थेट संवाद सभेने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापवले. या जाहीर सभेला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून, भाजपच्या बाजूने निर्माण झालेली एकजूट पाहता खरसुंडी गटात विजयाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.

    या प्रचार सभेला आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपल्या सडेतोड आणि आक्रमक भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडत खरसुंडी गटात भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचा ठाम दावा केला. “विरोधकांकडे सांगण्यासारखे काही उरलेले नाही. वर्षानुवर्षे जनतेला भूलथापा देण्याचेच काम त्यांनी केले. पण भाजपने विकास करून दाखवला आहे. त्यामुळेच आज खरसुंडीतील मतदार भाजपच्या पाठीशी ठाम उभे आहेत,” असा घणाघात त्यांनी केला. जनतेने आता काम करणारे, स्वच्छ चारित्र्याचे आणि जनतेतून आलेले नेतृत्व निवडण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे प्रतिबिंब या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येईल, असेही ते म्हणाले.

     या सभेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. “खरसुंडी गटाचा इतिहास पाहिला तर जनतेने नेहमीच विकासाला मत दिले आहे. विरोधकांनी फक्त अफवा, आरोप आणि दिशाभूल याचे राजकारण केले. पण खरसुंडीची जनता सजग आहे. चंद्रकांतभाऊ भोसले आणि लताताई अर्जुन पुजारी यांच्यासारख्या काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निर्णय जनतेने घेतला आहे,” असे बापूसाहेब देशमुख यांनी ठणकावून सांगितले. या वेळी त्यांनी भाजपच्या संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत “या निवडणुकीत विरोधकांना जागा उरणार नाही,” असा इशाराही दिला.

    उमेदवार चंद्रकांतभाऊ भोसले यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, शेतीपूरक योजना, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि मूलभूत विकासकामांचा ठोस आराखडा मांडला. “खरसुंडी गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा असून, जनतेचा विश्वास आम्ही कामातूनच सिद्ध करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तर सौ. लताताई अर्जुन पुजारी यांनी महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांना बळकटी, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर पंचायत समिती स्तरावर प्रभावी काम करण्याचे आश्वासन दिले.

     या प्रचार सभेला सरपंच धोंडीराम इंगवले, माजी सरपंच अर्जुन पुजारी, राहुल गुरव, सुभाष चोपडे, भाऊसाहेब गायकवाड, धनंजय पुजारी, नंदकुमार झंजे, विजय पुजारी, किरण पुजारी, बादशाह इनामदार, अतुल मोहिते, किरण सावकार, विक्रम भिसे, रणधीर गुरव यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खरसुंडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सभेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, “या निवडणुकीत भाजपलाच मतदान करून खरसुंडी गटाचा विकास वेगाने घडवायचा,” असा ठाम संकल्प मतदारांनी व्यक्त केला. सध्या खरसुंडी गटात भाजपचे निर्विवाद वर्चस्व दिसून येत असून, वाढता जनसमर्थनाचा ओघ पाहता चंद्रकांतभाऊ भोसले व सौ. लताताई अर्जुन पुजारी यांचा दणदणीत विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.

To Top