करगणी गटात रुपेश पाटील सक्रिय प्रचारात; विनायक मासाळ यांचा प्रचार जोमाने करणार ; सुनील पुजारींच्या पाठिंब्याने युतीला निर्णायक बळ!
आटपाडी kd24newz ; पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) – करगणी जिल्हा परिषद गटातील निवडणूक लढतीला निर्णायक कलाटणी देणारी घडामोड पिंपरी खुर्द येथे घडली. माजी सभापती रुपेश पाटील यांनी माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी–शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार मा. विनायक मासाळ (करगणी जि.प. गट) व मा. रामदास सूर्यवंशी (माडगुळे पं.स. गण) यांना जाहीर पाठिंबा देत स्वतः सक्रिय प्रचारात उतरून विनायक मासाळ यांचा प्रचार मोठ्या जोशाने करणार असल्याची ठाम घोषणा केली. या घोषणेमुळे करगणी गटातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
करगणी गटात प्रभावी नेतृत्व, संघटन क्षमता आणि प्रशासनाचा अनुभव असलेले रुपेश पाटील यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडताना सांगितले की, “मी केवळ पाठिंबा देऊन थांबणार नाही. गावोगावी जाऊन, कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून विनायक मासाळ यांचा प्रचार जोरात करणार आहे. करगणीचा विकास, निधी आणि कामांची गती वाढवायची असेल तर मासाळ–सूर्यवंशी यांनाच संधी दिली पाहिजे.” त्यांच्या या ठाम निर्धाराने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
पिंपरी खुर्द येथे पक्षप्रवेश....
करगणी जिल्हा परिषद गटातील प्रचाराला बळ देत पिंपरी खुर्द येथे प्रदीप रामचंद्र कदम, सुरेश नारायण कदम, सचिन संभाजी कदम आणि अमित बाळासो कदम यांनी राष्ट्रवादी–शिवसेना युतीत जाहीर पक्षप्रवेश केला. तानाजीराव पाटील नेतृत्वावर विश्वास ठेवून या झालेल्या पक्षप्रवेशामुळे परिसरात युतीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे.
दरम्यान, आंबेवाडीतील प्रभावी नेते सुनील पुजारी यांनीही विनायक मासाळ व रामदास सूर्यवंशी यांना जाहीर पाठिंबा देत विकासाभिमुख भूमिकेला ठाम साथ दिली. “करगणीला काम करणारे नेतृत्व हवे आहे; म्हणूनच युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे हीच योग्य भूमिका,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, आमदार सुहास भैय्या बाबर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व अध्यक्ष तानाजीराव पाटील, भारत तात्या पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील, सभापती संतोष पुजारी यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी एकसुरात सांगितले की, करगणी गटात निधी, विकासकामे आणि लोकाभिमुख प्रशासनाची दिशा ठरवण्याची क्षमता मासाळ–सूर्यवंशी यांच्याकडेच आहे.
एकूणच, रुपेश पाटील यांची सक्रिय प्रचारातील एंट्री, कार्यकर्त्यांचा वाढता ओघ आणि सुनील पुजारींचा ठाम पाठिंबा यामुळे करगणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी–शिवसेना युतीची आघाडी अधिक भक्कम झाली आहे. ही निवडणूक आता केवळ स्पर्धा न राहता विकास आणि विश्वासाची निर्णायक लढाई बनली असून, जनमत स्पष्टपणे युतीच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

