Sanvad News संविधाननिष्ठ शिक्षणाची मशाल उंचावणाऱ्या गुरुवर्यांना राजेंद्रबापू खरात यांच्याकडून जाहीर गौरव

संविधाननिष्ठ शिक्षणाची मशाल उंचावणाऱ्या गुरुवर्यांना राजेंद्रबापू खरात यांच्याकडून जाहीर गौरव

Admin

 संविधाननिष्ठ शिक्षणाची मशाल उंचावणाऱ्या गुरुवर्यांना राजेंद्रबापू खरात यांच्याकडून जाहीर गौरव!

जिल्हा नियोजन समिती सदस्यांकडून प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांना वाढदिवसानिमित्त सन्मानपूर्वक शुभेच्छा!

आटपाडी kd24newz :संविधान, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीवर कार्य करणाऱ्या गुरुवर्यांच्या कार्याला राजकीय व सामाजिक स्तरावरून मिळणारी दखल ही नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्याच अनुषंगाने राजेंद्र बापू खरात, सांगली जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, यांनी प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा जाहीर गौरव केला.

राजेंद्रबापू खरात यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले की, “प्रा. डॉ. रामदास नाईकनवरे सर हे केवळ शैक्षणिक प्रशासक नसून ते संविधानिक मूल्यांचे प्रखर प्रवक्ते आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, समाजाला विचारप्रवण करणे आणि महापुरुषांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणे हे कार्य ते सातत्याने करत आहेत.”

श्रीराम ज्युनिअर कॉलेज, आटपाडी या संस्थेचे प्राचार्य म्हणून कार्य करताना सरांनी शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजप्रबोधनाचे मोठे योगदान दिले आहे. संविधान जनजागृती सप्ताह, सात दिवसांच्या व्याख्यानमाला, परिसंवाद, कवी संमेलनांचे अचूक नियोजन,या सर्व उपक्रमांमुळे आटपाडी तालुका वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत असल्याचे राजेंद्र बापू खरात यांनी आवर्जून नमूद केले.

तसेच दरवर्षी रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या भव्य कवी संमेलनाच्या यशस्वी आयोजनामागे डॉ. नाईकनवरे सरांची असलेली भूमिका ही साहित्य क्षेत्रासाठी दिशादर्शक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना शिक्षण, संविधान आणि संस्कृती यांचा समन्वय साधणाऱ्या व्यक्तींचे समाजात मोलाचे स्थान असते, असे सांगत राजेंद्र बापू खरात यांनी सरांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छांमुळे आटपाडीतील शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून, गुरुवर्यांच्या कार्याला मिळालेली ही दखल नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

To Top